ETV Bharat / state

हा अमोल कोल्हेंचा विजय नसून संभाजी महाराजांचा विजय - आढळराव पाटील - NCP shirur

हा विजय राष्ट्रवादी काँग्रेसचा नसून सामान्य जनतेने संभाजी महाराजांना केंद्रस्थानी ठेवून मतदान केल्याने हा विजय छत्रपती संभाजी महाराजांचा असल्याचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मत व्यक्त केले.

आढळराव पाटील
author img

By

Published : May 27, 2019, 2:30 AM IST

पुणे - स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी विजयाचा झेंडा रोवत शिरूर लोकसभा मतदार संघावर आपला हक्क गाजवला. परंतु, हा विजय राष्ट्रवादी काँग्रेसचा नसून सामान्य जनतेने संभाजी महाराजांना केंद्रस्थानी ठेवून मतदान केल्याने हा विजय छत्रपती संभाजी महाराजांचा असल्याचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मत व्यक्त केले.

पत्रकार परिषदेत बोलताना आढळराव पाटील

माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी पराभवानंतर पंधरा वर्षात नियमित भरणारा जनता दरबार आजही नेहमीप्रमाणे भरणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. यावेळी अनेकांनी जनता दरबारात येऊन आपल्या समस्या मांडल्या. शिरूर लोकसभा मतदारसंघातील पराभव मान्य करून पराभवातील चुका सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन नागरिकांना दिले. गेल्या पंधरा वर्षांपासून शिरूर लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे वर्चस्व होते. मात्र, या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसला वर्चस्व मिळविण्यासाठी विविध प्रयोग करावे लागले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात माझ्या पराभवामुळे मला वाईट वाटले नाही तर चौथ्यांदा निवडून आलो असतो तर शिवसेनेला महत्त्वाचे मंत्रीपद मिळाले असते. हे मंत्रीपद गेल्याने तालुक्यातील जनतेला दुःख झाले आहे, असे स्पष्टीकरण यावेळी आढळराव पाटलांनी दिले. माझ्या पराभवाचा वचपा आंबेगाव तालुक्यातील जनता नक्कीच भरून काढेल असे सांगत थेट राजकीय विरोधक असलेल्या दिलीप वळसे पाटील यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. यापुढेही जनता दरबार भरला जाईल, अशी स्पष्टोक्ती आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विधानसभा निवडणुकीत मी उभा राहणार नाही, तर जनता ठरवेल तो उमेदवार इथून दिला जाईल. पण आपल्या दादाला ज्याने पाडले त्याचा आंबेगावची जनता समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत दिलीप वळसे पाटील यांच्यावर आढळराव पाटलांनी निशाणा साधला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात विजयाचा झेंडा रोवणार असल्याचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले

दरम्यान राज्यसभा हा माझा विषय नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे संधी मिळाली तरी राज्यसभेवर जाणार नाही, असे सांगत राज्यसभेवर जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

Intro:Anc_गेल्या पंधरा वर्षांपासून शिरूर लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचे वर्चस्व पाहायला मिळाले मात्र या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसला वर्चस्व मिळविण्यासाठी विविध प्रयोग करावे लागले मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला अपयशाला सामोरं जावं लागलं मात्र सध्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार शिवाजी आढळराव पाटलांना अपयशाचा सामना करावा लागत स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेता डॉ अमोल कोल्हे यांनी विजयाचा झेंडा रोवत शिरूर लोकसभा मतदार संघावर आपला हक्क गाजवला असताना हा विजय राष्ट्रवादी काँग्रेसचा नसून सामान्य जनतेने संभाजी महाराजांना केंद्रस्थानी ठेवून मतदान केल्याने छत्रपती संभाजी महाराजांचा हा विजय असल्याचा शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले

माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी पराभवानंतर पंधरा वर्षात नियमित भरणारा जनता दरबार आजही नेहमीप्रमाणे भरणार असल्याचे सांगत यावेळी अनेकांनी जनता दरबारात येऊन आपल्या समस्या मांडल्या यावेळी सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी करत आपला शिरूर लोकसभा मतदारसंघातील पराभव मान्य करून पराभवातील चुका सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन येणाऱ्या नागरिकांना दिले

शिरूर लोकसभा मतदारसंघात माझ्या पराभवामुळे मला वाईट वाटलं नाही तर चौथ्यांदा निवडून आलो असतो तर शिवसेनेला महत्त्वाचं मंत्रीपद मिळालं असतं हे मंत्रीपद गेल्याने तालुक्यातील जनतेला दुःख झाला आहे असं स्पष्टीकरण यावेळी आढळराव पाटलांनी दिला माझ्या पराभवाचा वचपा आंबेगाव तालुक्यातील जनता नक्कीच भरून काढेल असे सांगत थेट राजकीय विरोधक असलेल्या दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला असं सांगत यापुढे जनता दरबार भरला जाईल अशी स्पष्टोक्ती आडगाव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली विधानसभा निवडणुकीत मी उभा राहणार नाही तर जनता ठरवेल तो उमेदवार इथून दिला जाईल पण आपल्या दादाला जाने पाडले त्याचा आंबेगावची जनता समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही असं सांगत दिलीप वळसे पाटील यांच्यावर आढळराव पाटलांनी निशाणा साधला मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात यशस्वी विजयाचा झेंडा राहणार असल्याचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले

दरम्यान राज्यसभा हा माझा विषय नाही मी लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे संधी मिळाली तरी राज्यसभेवर जाणार नाही असं सांगत राज्यसभेवर जाण्याचा चर्चेला पूर्णविराम दिला

Body:...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.