ETV Bharat / state

Actor Vikram Gokhale : अभिनेता विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले ( Veteran actor Vikram Gokhale ) यांची प्रकृती ही चिंताजनक ( Vikram Gokhale condition is critical) असून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ( Dinanath Mangeshkar Hospital ) येथे गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहे.

Actor Vikram Gokhale
Actor Vikram Gokhale
author img

By

Published : Nov 23, 2022, 3:26 PM IST

Updated : Nov 23, 2022, 4:18 PM IST

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले ( Veteran actor Vikram Gokhale ) यांची प्रकृती ही चिंताजनक ( Vikram Gokhale condition is critical) असून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ( Dinanath Mangeshkar Hospital ) येथे गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून गोखले यांची तब्यत बिघडली होती.आज त्यांना दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू आहे.

15 दिवसांपासून डॉक्टरांच्या देखरेखीखाली - गेल्या 15 दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती खालावत असल्याचेही सांगण्यात आले. गेल्या 15 दिवसांपासून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांनी डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे . सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतेही वक्तव्य किंवा माहिती समोर आलेली नाही.

अभिनयासोबतच लेखन, दिग्दर्शन - अभिनेते विक्रम गोखले यांनी गेल्या महिन्यात 30 ऑक्टोबर रोजी 82 वा वाढदिवस साजरा केला होता. गोखले यांनी नाट्य, दूरचित्रवाणी, चित्रपट आदी क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. अभिनयासोबतच त्यांनी लेखन, दिग्दर्शनही केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला आघात हा चित्रपट समीक्षकांचा चांगलाच आवडला होता. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या माऊली या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Last Updated : Nov 23, 2022, 4:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.