पुणे - मुंबईत वाहतूक पोलिसांना लोक घाबरतात. वाहतूक नियमांचे पालनदेखील काही प्रमाणात होते. पुण्यातील लोक धीट आहेत, ते थांबत नाहीत. पण आता पुण्याचे लोक घाबरायला लागले आहेत. पुण्याचे लोक घाबरतात हेच खूप आहे, असा खोचक टोला सिनेअभिनेते विजय पाटकर यांनी पुणेकरांना लगावला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात होत होते. यावेळी वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना गुलाबाचे फूल देऊन सन्मानित करण्यात आल आहे.
हेही वाचा - जळगावात अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविले; विधी अधिकाऱ्याचा मृत्यू
नियम न पाळल्याने अपघात घडतात
अभिनेते विजय पाटकर म्हणाले की, जे काही अपघात घडतात, ते केवळ वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांमुळे. आपल्या देशात काही राज्यात वाहतुकीचे नियम पाळले जातात. मुंबईत देखील नियमांचे पालन होते. मुंबईत लोक वाहतूक पोलिसांना घाबरतात. पुण्यात धीट माणसे आहेत. पांढरा, काळा, हिरवा शर्ट घाला ते थांबत नाहीत. पण, आता पुण्याचे लोक घाबरायला लागले आहेत. पुण्याचे लोक घाबरतात हेच खूप आहे, असा खोचक टोला त्यांनी पुणेकरांना लगावला आहे. पुढे ते म्हणाले की, रस्ता सुरक्षेचे नियम आपण आपल्या कुटुंबासाठी पाळूया. यामुळे आपले जीवन आणखी सुरळीत होईल.
वाहतूक नियम न पाळणे ही एक कॉमेडी - पाटकर यांचा खोचक टोला
ट्रॅफिकचे बेसिक रूल्स आपण पाळत नाहीत. वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत, ही एक कॉमेडी आहे, असे म्हणत त्यांनी वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना टोला लगावला आहे. परदेशात मध्यरात्री तीन वाजताही वाहतुकीच्या नियमांचे पालन होते. पण, आपल्या इथे भरदिवसा तीनच्या सुमारास सुसाट वाहने चालवणारे चालक आहेत. यावेळी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षण सतीश नांदूरकर, मोहन जाधव यांच्यासह वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा - धक्कादायक! नागपूर मेट्रोत जुगारासह अश्लील नृत्य; प्रशासनाकडून कारवाईचे आदेश