ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान ; बारामतीत पाच दुकानदारांवर गुन्हे दाखल - emergency management law

कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. राज्यातही या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून या विषाणूपासून बचावासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यात आपात्कालीन व्यवस्थापन कायदा लागू केला आहे.

corona
बारामतीत दुकानदारांवर कारवाई
author img

By

Published : Mar 20, 2020, 9:59 PM IST

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. या आदेशाबाबत जनजागृती केल्यानंतरही दुकाने सुरू ठेवणाऱ्या पाच जणांवर बारामती शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. बारामती शहर पोलिसांनी राजेंद्र गुळूमकर (तांदुळवाडी रोड) आझम रज्जक शेख (पतंगशहानगर) फुलेश चौधरी, विनोद चौधरी (दोघेही रा. गुणवडी रोड) विकास जाधव आणि कशीम शब्बिर सियामवाला यांच्यावर कारवाई केली आहे. नागरिकांच्या आरोग्याला बाधा निर्माण केल्याप्रकरणी पाच दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा... गांभीर्य नाहीच..! तरीही शहरात फिरत होते कोरोनाचे संशयित; आरोग्य विभागाची कारवाई

कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. राज्यातही या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून या विषाणूपासून बचावासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यात आपात्कालीन व्यवस्थापन कायदा लागू केला आहे.

जिल्ह्यात सर्व स्तरावर या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. दादासाहेब कांबळे (बारामती उपविभागीय अधिकारी) नारायण शिरगावकर (उपविभागीय पोलीस अधिकारी) औदुंबर पाटील (पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस ठाणे) योगेश कडुसकर (मुख्याधिकारी) यांनी नागरिकांना या कायद्याचे पालन करण्याबाबत वारंवार आवाहन केले आहे. असे असतानाही बारामतीत काही दुकानदारांनी जिल्हाधिकार्‍यांचा आदेशाचा अवमान केल्याचे दिसून आले.

हेही वाचा... VIDEO: भारत 'स्टेज-२' च्या उंबरठ्यावर..जाणून घ्या काय आहेत 'कोरोना स्टेजेस'

बारामतीत सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर बाधा निर्माण केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी राजेंद्र गुळूमकर (तांदुळवाडी रोड) आझम रज्जक शेख (पतंगशहानगर) फुलेश चौधरी, विनोद चौधरी (दोघेही रा. गुणवडी रोड) विकास जाधव आणि कशीम शब्बिर सियामवाला यांच्यावर कारवाई केली आहे. पाचही दुकानदारांवर नागरिकांच्या आरोग्याला बाधा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, कोकाटे पोपट व इतर पोलीस कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.