ETV Bharat / state

पिंपरीत बुलेटच्या कर्कश आवाजात धूम ठोकणाऱ्या 350 जणांवर कारवाई - पिंपरी चिंचवड बुलेटस्वार बातमी

बुलेट चालकांना थांबवून त्यांच्या बुलेटची पाहणी केली जात आहे. बुलेटची नंबर प्लेट फॅन्सी आणि सायलेन्सर बदललेले नसल्यास त्यांना पोलीस जाऊ देत आहेत. अशा कारवाईमुळे सर्वसामान्याच्या डोक्याचा त्रास काही प्रमाणात कमी होत असल्याचे चित्र आहे. अन्यथा बुलेटच्या कर्कश आवाजाने अनेकांची झोप उडवली होती, असे म्हणण्यास हरकत नाही.

action against 350 people who were hit by the sound of bullets in pimpri at pune
पिंपरीत बुलेटच्या कर्कश आवाजात धूम ठोकणाऱ्या 350 जणांवर कारवाई
author img

By

Published : Oct 28, 2020, 6:51 PM IST

Updated : Oct 28, 2020, 7:21 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात कर्कश आणि सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजात बुलेटची धूम ठोकणाऱ्या बुलेट चालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अवघ्या एका महिन्यात 350 बुलेट चालकांवर ही कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबद्दलचे आदेश दिले होते. तसेच अनेकांच्या तक्रारी देखील आल्यानंतर बुलेट चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून साडेतीन लाख दंड वसूल करण्यात आला आहे. तर, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या चालकांकडून दहा लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी 'ईटीव्ही'शी बोलताना माहिती दिली.

पिंपरीत बुलेटच्या कर्कश आवाजात धूम ठोकणाऱ्या 350 जणांवर कारवाई
पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योग नगरी आहे. येथे राज्यासह इतर शहरातून अनेक जण स्थायिक झाले आहेत. त्यामुळे अनेक व्यक्ती आपला ठसा, दहशत प्रस्थापित करण्यासाठी कर्कश आणि सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजात बिनधास्त बुलेटची राईड मारत असल्याचे दिसते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मनस्ताप होत होता. अशा काही तक्रारीनंतर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बुलेट चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यात, फॅन्सी नंबर प्लेट, बुलेटचे सायलेन्सर बदलणे, रॅश ड्रायव्हिंग करणे अशी कारवाई पोलीस करत आहेत.

बुलेट चालकांवर पोलिसांचे विशेष लक्ष

शहरातील प्रत्येक मुख्य चौकात पोलिसांनी कंबर कसली असून बुलेट चालकांवर कारवाई केली जात आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांनी नव्या बुलेट खरेदी केल्या आहेत. बुलेटचे सायलेन्सर बदललेले असल्यास त्यांच्यावर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. चौकात बुलेट चालकांना थांबवून त्यांच्या बुलेटची पाहणी केली जात आहे. बुलेटची नंबर प्लेट फॅन्सी आणि सायलेन्सर बदललेले नसल्यास त्यांना पोलीस जाऊ देत आहेत. अशा कारवाईमुळे सर्वसामान्याचा डोक्याचा त्रास काही प्रमाणात कमी होत असल्याचे चित्र आहे. अन्यथा बुलेटच्या कर्कश आवाजाने अनेकांची झोप उडवली होती, असे म्हणण्यास हरकत नाही.

बुलेटचे सायल्सर बदलणाऱ्यांची आकडेवारी खालील प्रमाणे

हिंजवडी पोलीस ठाणे- 15, निगडी- 73, चिंचवड- 03, पिंपरी- 202, भोसरी- 02, देहूरोड- 20, तळवडे- 35 ऐकून आकडा- 350 आणि दंड- 3 लाख 53 हजार 900

Last Updated : Oct 28, 2020, 7:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.