पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरातील निगडी परिसरातून पिस्तुल आणि जिवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाने केली आहे. जेसन जॉन डिकोना (वय 24, रा. ओटास्किम, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.
सराईत गुन्हेगाराला सापळा रचून केली अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यात येत होता. तेव्हा, तपास पथकातील संदीप पाटील यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार हा निगडी ओटास्कीम येथील स्मशानभूमी परिसरात थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपीला संबंधित ठिकाणी सापळा रचून अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे तीस हजार रुपये किंमतीचे एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली आहेत.
हेही वाचा - गोंदिया : अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी 105 वाहनांचे परवाने निलंबित
या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली कारवाई
सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उप-निरीक्षक शाकीर जिनेडी, तसेच पोलीस अंमलदार गणेश हजारे, अशोक दुधवणे, सुनिन कानगुडे, संदीप पाटील, शकुर तांबोळी, किरण काटकर, शैलेश मगर, निशांत काळे, आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, सुधीर डोळस अशोक गारगोटे व प्रदीप गुट्टे यांचे पथकाने केली आहे.
हेही वाचा - मेळघाट : मुलींच्या शासकीय वसतीगृहात बनावट दारू तयार करणाऱ्या टोळीला अटक