ETV Bharat / state

मतदान साहित्य वाटप केंद्रावर जात असताना शिक्षकाचा अपघाती मृत्यू

author img

By

Published : Dec 18, 2022, 10:03 AM IST

मतदान केंद्रावर जात असताना शिक्षकाचा ( teachers death in Velhe Taluka ) अपघातात मृत्यू झाला आहे. हा अपघात वेल्हे तालुक्यात झाला आहे. पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल ( teachers death on election duty ) केला आहे.

शिक्षकाचा अपघातात मृत्यू
शिक्षकाचा अपघातात मृत्यू

पुणे: शिक्षकांना शिक्षकाचे काम करू द्या व त्यांना इतर काम लावू नये अशी सतत मागणी होत असताना निवडणूक प्रक्रियेचे ( Teacher death while election work ) काम करत जात असताना एका शिक्षकाचा मृत्यू झालेला आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यामधील हे शिक्षक आहेत. त्यांचा अपघातात मृत्यू झालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा यावर चर्चा होऊ लागली आहे की शिक्षकांना शिक्षकाचे काम द्यावे काहीतरी कामात ( work for teachers in election ) अडकवून ठेवावे.

वेल्हे तालुक्यात मतदान साहित्य वाटप केंद्रावर दुचाकीवरून जात असताना ट्रकची धडक बसून शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. वेल्हे तालुक्यातील धानेप गाव जवळ ही घटना घडली आहे. सागर नामदेव देशमुख (वय.33)मूळ गाव. वारंगुसी , तालुका. अकोले,जि.नगर असे असून ते वेल्हे तालुक्यातील कंधारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये उपशिक्षक म्हणुन कार्यरत होते. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी देशमुख यांची मतदान अधिकारी क्र.३ म्हणुन नियुक्ती करण्यात आली होती अशी माहिती वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली.

ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल शिक्षक देशमुख हे पानशेतकडून कादवे मार्गे गाडी क्रमांक mh CB 7314 ने वेल्हे याठिकाणी मतदान साहित्य वाटप केंद्रावर येत असताना धानेप गावच्या हद्दीत हा अपघात घडला. MH-12 MV 5190 ह्या क्रमांकाच्या ट्रकची व दुचाकीची धडक झाली. दरम्यान त्यांना उपचारासाठी वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर हिरास यांनी दिली. या घटनेबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे अंमलदार औदुंबर अडवाल यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.