पुणे - पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील हॉटेल पंकजसमोर आज ( सोमवारी) सकाळी मोटरसायकल, बोलेरो जीप आणि टाटा एस या वाहनांच्या तिहेरी अपघातात एक जण ठार झाला असून दोन जण जबर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने महामार्गावरून बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे. मोटरसायकलस्वार शिवम यादव, बोलेरो चालक गणेश सुरेश शेलार आणि टाटा एस चालक सुशील संतोष गायकवाड, अशी जखमींची नावे आहेत. जखमींपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आज (सोमवारी) सकाळी पुणे - बंगळूरू महामार्गावरील सातारा-कराड लेनवर बोलेरो जीप रूग्णाला घेऊन भरधाव निघालेल्या बोलेरोने समोरच्या टाटा एसला जबर धडक दिली. त्यामुळे टाटा एस महामार्गावर पलटी झाले. पलटी होताना या वाहनाची मोटरसायकलला धडक बसली. या अपघात मोटरसायकलस्वारही जखमी झाला. या तिहेरी अपघात तीन जण जखमी झाले आहे. त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग हेल्पलाईनचे आणि कराड शहर पोलीस ठाण्याच्या अपघात विभागाचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला केली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.