ETV Bharat / state

पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी; चालकाचा मृत्यू

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अमृतांजन पुलाखाली ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

accident on mumbai pune expressway driver died on the spot
पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी; चालकाचा मृत्यू
author img

By

Published : Oct 10, 2020, 3:20 PM IST

पुणे- पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर अमृतांजन पुलाखाली चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सकाळी झाला असून काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती, अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

साखरेच्या पोत्याने भरलेला ट्रक हा पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. तेव्हा ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वळण असलेल्या ठिकाणी अमृतांजन पुलाखाली ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालकाचा साखरेच्या पोत्याखाली अडकल्याने जागीच मृत्यू झाला आहे. अद्याप चालकाचे नाव समजू शकले नाही. अपघाताची माहिती समजताच बोरघाट महामार्गचे पोलीस कर्मचारी व अधिकारी आणि आयआरबीचे पथक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळावर जात क्रेनच्या सहाय्याने ट्रक व पोती बाजूला करत मृत व्यक्तीला बाहेर काढले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.