पुणे: या अपघातात दिलीप डोके वय २० वर्षे, विजया दिलीप डोके वय ४५ वर्षे, या माय लेकांसह ओंकार चंद्रकांत सुक्रे वय २० वर्षे तिघे राहणार खडकवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. धामारी येथील खंडोबा मंदिराच्या जवळली वळणावर शिक्रापूरच्या बाजूने आलेल्या एम. एच. १४ जि. यु. ६८८० या टेम्पोची डोके याच्या गाडीला जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला.
सरपंच होण्याअधीच मृत्यू : यातील विजया दिलीप डोके या आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी गावच्या ग्रामपंचायतीच्या विद्यामना सदस्य होत्या आणि त्या लवकरच सरपंच देखील होणार होत्या. या ग्रमापांचातीचे सरपंचपद महिलेसाठी राखीव असल्याने अगोदर महिलांना यावर संधी देण्यात आली होती. आता विजया डोके या सरपंच पदावर विराजमान होणार होत्या. मात्र एका अपघाताने त्या कायमच्या सर्वांना सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांसह गावावर शोककळा पसरली आहे.
दोघेही पासून जिवलग मित्र: याशिवाय संकेत डोके आणि ओंकार सुक्रे हे दोघेही लहानपणा पासून जिवलग मित्र होते. पूजेच्या कार्यक्रमासाठी सर्वजण सोबत गेले होते. मात्र नियतीने त्यांची मैत्री मृत्यूनंतरही आबादित ठेवली. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
टायर फुटल्याने घडला अपघात: या आधीही असाच एक अपघात घडला होता. सोलापूरहून एक खासगी ट्रॅव्हल बस पुण्याकडे येत होती. सर्व प्रवासी झोपेत असताना एक फ्रेब्रुवारीच्या पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास माणगावजवळील सीएनजी पंपाजवळ टायर फुटल्याने हा अपघात घडला होता. एक ट्रक रस्त्यात थांबलेला होता बसचालकाला हा ट्रक उशीरा दिसला़ त्याला चुकवून पुढे जाताना चालकाचा अंदाज चुकला. बसने ट्रकला मागून जोरात धडक दिली होती. त्यात बसची एक बाजू पूर्णपणे फाटली आहे होती. या अपघातात चालकही जखमी झाला होता. ट्रकला बसने धडक दिल्याने 4 जण ठार, 15 जखमी झाले होते.
हेही वाचा: Pune Solapur Road Accident पुणेसोलापूर महामार्गावर बसचा भीषण अपघात ४ जण जागीच ठार १५ जखमी