पिंपरी-चिंचवड(पुणे) - शहरातील जम्बो कोविड सेंटरमधील एसी बंद पडला. आजच जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. शंभर पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत असून एसी बंद झाल्याने रुग्णांना घामाच्या धारा लागल्या आहेत. कोविड सेंटरला प्लास्टिकचे आवरण असून त्यामुळे एसी नसताना कोविडा सेंटरमध्ये थांबणे कठीण आहे.
हेही वाचा - INTERVIEW : सचिन वाझे, विनायक शिंदे प्रकरणी माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी धनराज वंजारींसोबत बातचीत
शंभर पेक्षा अधिक रुग्ण घेत आहेत उपचार
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने नेहरू नगर येथील कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. मात्र, पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं असून पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले होते. त्यानुसार, आजपासून 200 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यांची मूळ क्षमता ही 800 बेडची आहे.
यावर बोलण्यास महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा नकार
दरम्यान, आज सकाळी कोविड सेंटरमध्ये काही जाणवले नाही. मात्र, दुपार च्या सुमारास कडक उन्हामुळे आतमधील एसी बंद पडल्याचे समोर आलं आहे. कोविड सेंटर ला प्लास्टिक चे आवरण असून यामुळे जास्त गरम होते. याप्रकरणी अधिकृत बोलण्यास महानगर पालिका अधिकारी तयार नाहीत. त्यामुळे एसी सुरू होण्यास किती वेळ लागेल हे सांगणे कठीण आहे.
हेही वाचा - मराठमोळ्या रजनीकांतला दादासाहेब फाळके पुरस्कार, जावडेकरांनी केले जाहीर