ETV Bharat / state

Diwali Celebration : 13 वर्षापासून साजरी होतेय रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांबरोबर दिवाळी

समाजातील वंचित व गरजू मुला- मुलींना दिवाळी साजरी करता यावी, यासाठी आबा बागुल मित्र परिवाराकडून (Aba Bagul Mitra Mandal) विविध उपक्रम घेण्यात येतात. गेल्या 12 वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे यंदा 13 वे वर्ष (Aba Bagul Mitra Mandal celebrated Diwali) आहे.

Diwali with children selling goods on street
रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांसोबत दिवाळी
author img

By

Published : Oct 22, 2022, 1:16 PM IST

पुणे : गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभुमिवर सर्वच सण उत्सव हे निर्बंधामध्ये साजरा झाले. यंदा निर्बंधमुक्त असल्याने मोठ्या उत्साहात सण उत्सव साजरा होत आहे. सर्वत्र दिवाळीचा माहौल तयार झाला असून मोठ्या उत्साहाने नागरिक दिवाळीची तयारी करत आहे. समाजातील वंचित व गरजू मुला- मुलींना दिवाळी साजरी करता यावी, यासाठी आबा बागुल मित्र परिवाराकडून (Aba Bagul Mitra Mandal) विविध उपक्रम घेण्यात येतात. रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांना दिवाळीचा आनंद अनुभवता यावा, यासाठी दिवाळी फराळ, नवीन कपडे व फटाके देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पाटावर बसवून, अवतीभवती सुंदर रांगोळी काढून, सुगंधी उटणे, मोती साबण व गरम पाण्याने अभ्यंगस्नान घालून दिवाळी साजरी करण्यात (Diwali with children selling goods on street)आली.

यंदा उपक्रमाचे 13 वे वर्ष : माजी उपमहापौर आबा बागुल, अमित बागुल, समस्त बागुल कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांकडून या मुलांना सुवासिक तेल- उटणे लावून त्यांचे औक्षण करून मंगलमय वातारणात शाही अभ्यंगस्नान घालण्यात आले. यानंतर मुलांना नवे कपडे, फराळ आणि फटाके अशी मेजवानी देखील मिळाली. गेल्या 12 वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे यंदा 13 वे वर्ष (Aba Bagul Mitra Mandal celebrated Diwali) आहे.

'या' मुलांना आधार : आपण पाहतो की सर्वसामान्य नागरिक दिवाळीची तयारी करत आहे. प्रत्येक जण आनंदात असून मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरा करत आहे. पण ही मुलं भीक न मागता रस्त्यावर फुगे, खेळणी तसेच तिरंगा विकत आहे. म्हणजेच मेहेनत करून ही मुलं आपले जीवन (children selling goods on street) जगतात. यांना देखील दिवाळी उत्साहात साजरा करण्याचा अधिकार आहे. म्हणून आम्ही आमच्या घरच्याप्रमाने या मुलांना अभ्यंगस्नान घालून त्यांना अंघोळ करून नवीन कपडे घालून फटाके फोडून मिठाई देऊन दिवाळी साजरी (Diwali Celebration) करतो. शासनाने या मुलांना आधार देत त्यांच्यासाठी विशेष अशी शिक्षणाची सोय करावी, त्यासाठी येणाऱ्या काळात मी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आयोजक आबा बागुल यांनी सांगितलं.

पदपथावर लेकरांची सुखद सकाळ : डेक्कन येथे गुडलक चौकात झालेल्या या अनोख्या उपक्रमात पदपथावर राहणाच्या मुला-मुलींना आजची सकाळ सुखद ठरली. खेळण्याचे आणि शिकण्याचे वय असतानाही केवळ परिस्थितीने पोटाची खळगी भरण्यासाठी दररोजची सकाळ रोजगारासाठी उजाडते. आई-वडिलांसह पदपथावर राहणाऱ्या या मुलांची सकाळ मात्र आज आनंददायी ठरली. कार्यकर्त्यांकडून परिसराची स्वच्छता करून घातलेला रांगोळ्यांचा सडा आणि मांडलेले पाट हे चित्र बघून ती मुले हरखून गेली. सुरुवातीला शाही अभ्यंगस्नान केले. नंतर नवीन कपडे परिधान करून या मुलांनी दिवाळीचा आनंद (Diwali 2022) लुटला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.