ETV Bharat / state

Kasba By Elections : कसबा पोटनिवडणूकीतून आम आदमी पक्षाची माघार; आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धार - आम आदमी पक्ष

महाराष्ट्रात पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे. त्यांनी कसबा पोटनिवडणुकीतून माघार घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Kasba By Elections
Kasba By Elections
author img

By

Published : Feb 10, 2023, 6:04 PM IST

पोटनिवडणूकीतून आम आदमी पक्षाची माघार

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक पक्षाकडून अपक्ष तसेच नाराज उमेदवारांची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे. आम आदमी पार्टीचे किरण कद्रे यांनी कसबा पेठ विधानसभामधून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनतर आज पक्षाने पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय न घेतल्याने कद्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

आगामी निवडणुका लढवणार : आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्यातील शहरी, ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी सज्ज होत आहे असे आपच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील खोक्या-बोक्याच्या राजकारणाला सामान्य जनता कंटाळलेली आहे. मागच्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची संगीत खुर्ची राज्यातील जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितली आहे. कोणताही प्रस्थापित पक्ष कोणत्याही इतर प्रस्थापित पक्षासोबत सत्ता स्थापन करू शकतो असा आरोत मेनन यांनी केला आहे.

आमदारांनी खोके घेतल्याचा आरोप : या प्रस्तापीत पक्षांना कोणतीही वैचारिक भूमिका नाही, हे राज्यातील जनतेला हे कळून चुकले आहे. आमदारांनी राजकीय पक्ष बदलण्यासाठी अथवा सत्तेत भागीदार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे घेतल्याच्या चर्चा जनसामान्यांमध्ये दररोज घडत आहेत. लोक या प्रकाराला कंटाळले आहेत असे प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितले.

भ्रष्टाचार रहित प्रशासन : दिल्लीतील वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, भ्रष्टाचार रहित प्रशासकीय सेवा यांचे विकासाचे मॉडेल लोकांना मनापासून आवडले आहे. पंजाबमध्ये देखील याच मॉडेलच्या धर्तीवर आम आदमी पक्षाच्या सरकारचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल हे महाराष्ट्रातील जनतेमध्ये लवकरच येतील. याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून होईल अशी माहिती त्यांनी दिली.

पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय : सद्या आम आदमी पार्टीने महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकतीनिशी लढू. त्यानंतर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका देखील जोमाने लढवणार आहोत असे यावेळी राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितल आहे.

हेही वाचा - Ban BBC Plea Dismissed by SC: बीबीसीवर भारतात पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.