ETV Bharat / state

Video : नांदेड-शिवणे पुलावरुन वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू - Pune rains update

राज्यासह पुणे शहरात देखील गेल्या काही दिवसांपासून मुसळधार (Heavy rain in Pune) पाऊस सुरू असून खडकवासला धरण शंभर टक्के (Khadakwas Dam overflow) भरला असून धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. नांदेड- शिवणे पुलावरून मंगळवारी (Nanded Shivane Bridge Pune) पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास दोन तरुण पाण्यातून वाहून गेले होते. त्यापैकी एक तरुण बचावला असून, दुसर्‍या तरुणाचा मृतदेह वारजे येथील दांगट पाटील नगर परिसरात मिळून आला आहे.

Nanded Shivane Bridge
नांदेड-शिवणे
author img

By

Published : Jul 14, 2022, 1:03 PM IST

पुणे : नांदेड- शिवणे पुलावरून (Nanded Shivane Bridge Pune) मंगळवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास दोन तरुण पाण्यातून वाहून गेले होते. त्यापैकी एक तरुण बचावला असून, दुसर्‍या तरुणाचा मृतदेह (Young man's body ) वारजे येथील दांगट पाटील नगर परिसरात मिळून आला आहे. निखील निरजकुमार कौशिक (वय.25,रा. नांदेड सिटी, मुळ. गाजीयाबाद ) असे मृत तरुणाचे नाव आहे. निखील हा शहरातील एका आयटी कंपनतीत काम करत होता. तर आशिष देवीदास राठोड ( रा. नांदेड सिटी, मुळ. अकोला) याने पुलाच्या कठड्याला घट्ट धरून ठेवल्याने तो बचावला आहे.

निखील आणि आशिष हे दोघे पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास रिक्षातून आले होते. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याने नांदेड-शिवणे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे रिक्षावाल्याने त्यांना अलीकडेच सोडले. पुल ओलांडत असताना पाण्याचा प्रवाहात निखिल आणि आशिष वाहून जात होते. त्या वेळी आशिषने पुलाच्या खांबाला घट्ट पकडून ठेवल्याने तो बचावला. शिवणे गावातील रहिवासी विद्याधर दळवी, महेश कांबळे, राज वाल्मिकी यांनी दोर टाकून आशिषला बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाकडून (Pune Police and Fire Brigade) वाहून गेलेल्या निखीलचा शोध घेत होते. त्यावेळी वारजे येथील दांगट पाटील नगर परिसरातील नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह मिळून आला. त्याची ओळख पटविली असता, तो निखील असल्याचे समोर आले आहे.

पुणे - शहरात गेल्या आठवड्याभरापासून मुसळाधार पाऊस सुरू आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात १४ व १५ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशरा दिला असल्याने जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना १४ जुलै ते १६ जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्रास होऊ नये म्हणून शहरात खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी आवश्‍यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. ( Heavy Rains In Pune For A Week ) आता खासगी अस्थापना तसेच आयटी कंपन्यांनाही महापालिकेने वर्क फ्रॉम होमसाठी कर्मचाऱ्यांना दोन दिवस प्रोत्साहन द्यावे, अशी विनंती केली आहे.

14 जुलै ते 17 जुलै पर्यंत 144 कलम लावण्यात आले - शहरात पावसामुळे वाहतूककोंडी होत आहेच, शिवाय, मुठा नदीतही मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय, पावसामुळे शहरात मोठया प्रमाणात झाडपडीच्या घटनाही घडत आहेत. अशा स्थितीत संभाव्य धोके टाळण्यासाठी महापालिकेकडून हे आवाहन करण्यात आले आहे. अशातच महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यातील सर्व गडकिल्ले, पर्यटन क्षेत्र तसेच धरण परिसरात पुढील तीन दिवस म्हणजेच 14 जुलै ते 17 जुलै पर्यंत 144 कलम लावण्यात आले आहे. नागरिकांना पुढील तीन दिवस नियमांच पालन करावे अस आवाहनही प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा : Maharashtra Rain Update : राज्यात जोरदार पावसाचा इशारा, आज 'या' ठिकाणी रेड अलर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.