ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात विहिरीचे खोदकाम करताना ढिगा-याखाली अडकलेल्या 'त्या' मजुराचा मृत्यू - rescue operation

विहिरीचे खोदकाम सुरू असताना गुरूवारी सायंकाळच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील कोल्हारवाडी गणेशनगरमध्ये विहिरीचा वरचा भाग खाली पडल्याने एक मजूर या ढिगाऱ्याखाली दबला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती.

ढिगा-याखाली अडकलेल्या 'त्या' मजूरचा मृत्यू
author img

By

Published : Apr 19, 2019, 5:08 AM IST

Updated : Apr 19, 2019, 7:33 AM IST

पुणे - सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्यासाठी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये नव्याने विहिरी आणि जुन्या विहिरींची खोली करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विहिरीचे खोदकाम सुरू असताना गुरूवारी सायंकाळच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील कोल्हारवाडी गणेशनगरमध्ये विहिरीचा वरचा भाग खाली पडल्याने एक मजूर या ढिगाऱ्याखाली दबला गेल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये त्या मजुराचा मृत्यू झाला आहे. किसन दामू गावडे असे या मजुराचे नाव आहे.

घटनास्थळावरील मदतकार्याची दृश्ये

दरम्यान हे खोदकामाचे काम सुरू असताना अचानक ही घटना घडल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीने किसन यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र विहिरीचे खोलीकरण जास्त असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते.

Intro:Anc__ सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये नव्याने विहिरी व जुन्या विहिरींची खोली करण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असताना आज सायंकाळच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील कोल्हारवाडी येथे विहिरीतील खोदकाम सुरू असताना विहिरीचा वरचा भाग खाली पडल्याने एक व्यक्ती डिगा-याखाली दाबला गेल्याची धक्कादायक घटना घडली असून किसन दामू गावडे असे विहीरीच्या ढिगार्‍यात अडकलेल्या व्यक्तीचे नाव आहे

आंबेगाव तालुक्यातील कोल्हारवाडी गणेशनगर येथे विहिरीच्या खोलीकरणाचे काम सुरू असताना आज सायंकाळच्या सुमारास अचानक विहिरीच्या वरच्या भागातील बांधकाम व रेती अचानक विहीरीत पडल्याने खाली काम करत असणाऱ्या मजुराच्या अंगावर पडले त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने या व्यक्तीला बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र विहिरीचे खोलीकरण जास्त असल्यामुळे मदत कार्यात अडथळे येत होते त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले असून एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल होऊन विहिरीत डिगा-याखाली अडकलेल्या व्यक्तीच्या बचावासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेतBody:ब्रेकिंग..स्टोरीConclusion:
Last Updated : Apr 19, 2019, 7:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.