ETV Bharat / state

पूरग्रस्तांना वडापाव विकून करणार आर्थिक मदत; ८०० पेक्षा जास्त विकले वडापाव

author img

By

Published : Aug 13, 2019, 11:35 PM IST

पिंपरी-चिंचवड शहरातील अभिजीत जाधव यांनी पूरग्रस्तांना मदत व्हावी म्हणून एक दिवसाचे उत्पन्न त्यांना देण्याचे ठरवले. त्यासाठी वडापाव विक्री करून येणारे पैसे पूरग्रस्तांना देणार असल्याचे वडापावच्या गाडी शेजारी एक साउंड सिस्टीम लावून त्याद्वारे नागरिकांना मदतीचे आवाहन केले. यानंतर आत्तापर्यंत त्यांच्याकडचे ८०० पेक्षा जास्त वडापाव विक्री झाले.

वडापाव

पुणे - कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील पूरपरिस्थिती खूप भयंकर आहे. यामुळे लाखो नागरिकांचे स्थलांतरण करून त्यांना सुखरूप स्थळी हलवण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकीमधून अनेकजण पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावले आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील अभिजीत जाधव यांनी पूरग्रस्तांना मदत व्हावी म्हणून एक दिवसाचे उत्पन्न त्यांना देण्याचे ठरवले असून आत्तापर्यंत त्यांच्याकडचे ८०० पेक्षा जास्त वडापाव विक्री झाले.

पूरग्रस्तांना वडापाव विकून आर्थिक मदत

अभिजीतचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. थेरगाव परिसरात जाधव वडेवाले नावाने ते वडापावचा गाडा चालवतात. सध्याची पूरपरिस्थिती पाहता त्यांनी सांगलीतील वाळवा गावातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचे ठरविले. त्यासाठी वडापाव विक्री करून येणारे पैसे हे त्यांना देणार असल्याचे वडापावच्या गाडी शेजारी एक साउंड सिस्टीम लावून त्याद्वारे नागरिकांना मदतीचे आवाहन केले.

हे आवाहन करताच नागरिकांनी गाड्याजवळ गर्दी केली. आणि सकाळपासून त्यांचे ८०० पेक्षा जास्त वडापाव विक्री झाले आहेत. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने पूरग्रस्तांना मदत करावीशी वाटली, असे जाधव यांनी यावेळी सांगितले.

सध्या पूरग्रस्त नागरिक अडचणीत आहेत, त्यांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे मी हे ठरविले. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी इतर नागरिकदेखील वडापाव विकत घेऊन चांगला प्रतिसाद देत आहेत. मंगळवारी रात्री ९ वाजेपर्यंत वडापावचा गाडा सुरू राहणार असून नागरिकांनी वडापावचा आस्वाद जरुर घ्यावा जेणेकरून पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत होईल, असे जाधव म्हणाले.

Intro:mh_pun_03_help_av_mhc10002Body:mh_pun_03_help_av_mhc10002

Anchor:- कोल्हापूर,सांगली आणि सातारा येथील पूरपरिस्थिती खूप भयंकर आहे. लाखो नागरिक स्थलांतरित झाले असून त्यांना सुखरूप स्थळी हलवण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी मधून अनेक जण पूरग्रस्तांना मदत करत आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील अभिजित जाधव यांनी पूरग्रस्तांना मदत व्हावी म्हणून एक दिवसाचे उत्पन्न त्यांना देण्याचे ठरवले असून आत्ता पर्यंत आठशे पेक्षा जास्त वडापाव विक्री झाले आहेत. अभिजित यांचे थेरगाव परिसरात जाधव वडेवाले म्हणून गाडा आहे. तेथे ते वडापाव विक्रीचा व्यवसाय करतात. आवाहन करताच नागरिक गाड्यापाशी गर्दी करत आहेत.अभिजित जाधव हे सांगलीतील वाळवा गावातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करणार आहेत. त्यामुळे त्यांनी वडापाव विक्री करून येणारे पैसे हे त्यांना देणार आहेत. वडापाव च्या गाडी शेजारी एक साउंड सिस्टीम लावले असून त्याद्वारे नागरिकांना आवाहन केले जात आहे. जाधव म्हणाले, सामाजिक बांधिलकी वाटल्याने त्यांना मदत करावी शी वाटली. त्यांना सध्या अडचण आहे त्यांना मदत करणे गरजेचे आहे. सकाळ पासून ८०० पेक्षा जास्त वडापाव विक्री झाले आहेत. नागरिक पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी चांगला प्रतिसाद देत आहेत. रात्री नऊ वाजे पर्यंत वडापाव गड सुरू राहणार असून नागरिकांनी वडापाव चा आस्वाद घ्यावा जेणेकरून पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत होईल असे जाधव म्हणाले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.