ETV Bharat / state

उजनी धरणाजवळ आढळली सात फूट लांबीची मगर, परिसरात खळबळ - उजनी धरणाजवळ आढळली मगर

आंदुबाई मंदिरासमोर सात वाजण्याच्या सुमारास उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी भारत साखरे यांना मगर आढळून आली. त्यांनी तरटगावचे पोलीस पाटील अनिल भांगे यांना ही माहिती कळवली. त्यानंतर भांगे यांनी उजनी धरण सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांना सतर्क केले.

magar
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Dec 1, 2019, 5:09 PM IST

पुणे - तरटगाव येथील उजनी धरणाच्या माती भराव्याजवळ सात फुट लांबीची आणि सुमारे पावणेदोनशे किलो वजनाची मगर आढळली आहे. सतर्क ग्रामस्थ, पोलीस आणि मासेमारी करणाऱया युवकांनी या मगरीला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. गावापासून जवळच मगर आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

उजनी धरणाच्या माती भराव्याजवळ आढळली सात फुट लांबीची मगर

इंदापूर तालुक्यातील तरटगाव गावापासून काही अंतरावर असणाऱ्या मत्स्यबीज उत्पादन केंद्रापासून साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर उजनी धरणाचा मातीचा भराव आहे. त्याच्या मुख्य द्वारापासून पाचशे मीटर अंतरावर आंदुबाई मंदिरासमोर सात वाजण्याच्या सुमारास उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी भारत साखरे यांना मगर आढळून आली. त्यांनी तरटगावचे पोलीस पाटील अनिल भांगे यांना ही माहिती कळवली. त्यानंतर भांगे यांनी उजनी धरण सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांना सतर्क केले.

हेही वाचा - उस्मानाबादमध्ये शेतात आढळली मगर!

इंदापूर पोलीस ठाण्याचे नाईक महेश मानेदेखील आपल्या सहकाऱ्यांसोबत तिथे पोहोचले. मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या महादेव नगरे, रवींद्र नगरे, अशोक चमरे, दीपक नागरे, दशरथ पटोले, शशिकांत सले, संदीप खानेवाले, पिंटू सले, वैभव सले, संदीप नगरे, सतीश नगरे, सोमनाथ नगरे यांनी धाडसाने ही मगर पकडण्यासाठी मदत केली. मगरीला कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात नेण्यात येणार आहे. तिथे तिची आरोग्य तपासणी करण्यात येईल. त्यानंतर तिला तिच्या अधिवासात सोडण्यात येईल, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Intro:Body:इंदापूर :
उजनी धरणाच्या माती भराव्या जवळ सात फुट लांबीची, सुमारे पावणेदोनशे किलो वजनाची मगर सापडली.सतर्क स्थानिक कर्मचारी,पोलीस पाटील,पोलीस व मासेमारी करणा-या युवकांच्या धाडसामुळे सतर्क तिला जेरबंद करण्यात यश मिळाले.त्या मगरीला वनविभागाच्या ताब्यात दिले आहे.उजनी धरणा नजीक मगर सापडल्याच्या वृत्ताने परिसरात खळबळ उडाली आहे.

    सविस्तर वृत्त असे की,तरटगाव (ता.इंदापूर) गावापासून काही अंतरावर असणा-या मत्स्यबीज उत्पादन केंद्रापासून साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर उजनी धरणाचा मातीचा भराव आहे.तेथील मुख्य द्वारापासून पाचशे मीटर अंतरावर आंदुबाई मंदिरासमोर आज (दि.१) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी भारत साखरे (रा.कांदलगाव, ता.इंदापूर) यांना मगर आढळून आली.त्यांनी तरटगावचे पोलीस पाटील अनिल भांगे यांना ही माहिती कळवली.भांगे यांनी उजनी धरण सुरक्षा विभागाच्या कर्मचा-यांना सतर्क केले.

    दरम्यानच्या काळात इंदापूर पोलीस ठाण्याचे नाईक महेश माने आपल्या सहका-यांसमवेत तेथे पोहोचले.मासेमारीचा व्यवसाय करणा-या महादेव नगरे,रवींद्र नगरे, अशोक चमरे,दीपक नागरे,दशरथ पटोले,शशिकांत सले, संदीप खानेवाले,पिंटू सले,वैभव सले,संदीप नगरे सतीश नगरे,सोमनाथ नगरे यांनी धाडसाने ही मगर जेरबंद केली. तेथे आलेले वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या ताब्यात तिला देण्यात आले.या मगरीला कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात नेण्यात येईल.तेथे तिची आरोग्य तपासणी करण्यात येईल.त्या नंतर तिला तिच्या अधिवासात सोडण्यात येईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितलेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.