पुणे : 'बीबीसी'ने तयार केलेल्या एका माहितीपटावरुन देशभरात वादळ उठले आहे. हा माहितीपट सर्व सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवरुन काढण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. माहितीपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदनामीच्या हेतूने केल्याचे म्हटले जात आहे.आत्ता हे माहितीपट देशभरातील विविध महाविद्यालयांमध्ये देखील दाखविण्यात आले आहे. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन या सस्थेत देखील हा माहितीपट दाखविण्यात आला आहे.
FTII मध्ये माहितीपटाचे स्क्रिनिंग : प्रशासनाला ही माहिती कळाल्यानंतर त्यांनी याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. एफटीआयमधील विद्यार्थी संघटनेच्यावतीनं त्या माहितीपटाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या माहितीपट कोणतीही बंदी नसायला हवी. नागरिकांनी माहितीपट पाहयचा किंवा नाही त्यांनी ठरवायला हेवे असे FTII च्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या माहितीपटात काय सत्य आहे ते देशातील नागरिकांना ठरण्याचा अधिकार आहे. मात्र, माहितीपटारवर सरकाने बंदी का घातली? असा सवाल देखील विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.
100 विद्यार्थ्यांनी पाहिली माहितीपट : माहितीपट बनवणाऱ्यांनी त्यांच्या दृष्टीकोनातून माहितीपट बनवला आहे. FTII मध्ये जेव्हा माहीतपट दाखवण्यात आला. तेव्हा माहितपट पाहून चांगले वाटल्याची प्रतिक्रिया FTII च्या विद्यार्थांनी दिली आहे. जेव्हा माहितीपटाचे स्क्रिनिंग झाले तेव्हा आम्ही 100 विद्यार्थ्यांनी एकत्र माहितीपट बघितल्याची माहिती फिल्म अण्ड टेलिव्हिजन संस्थेच्या विद्याथ्यांनी दिली.
काय आहे माहितीपट : हा माहितीपट गोध्रा हत्याकांडावर आधारित आहे. या माहितीपटाने अनेकांचे लक्ष वेधुन घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माहितीपट असल्याने भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे. 2002 साली गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतांना दंगल उसाळली होती. त्यावर बीबीसीने माहितीपट बनवला आहे. या माहितीपटाने दंगलीमधील अनेक बाबी समोर आल्या आहेत. बीबीसीनं जेव्हा सोशलमीडियावर हा माहितीपट प्रसारित केला त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आता हा माहितीपट सोशल मीडियावरुन हटवण्यात आला आहे. एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे की, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इंडिया- द मोदी क्वश्चन या माहितीपटाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने सोशल मीडियावरुन या माहितीपटाची लिंक हटवण्याचे निर्देश दिले होते.
हेही वाचा - Indigo Flight Open Emergency Door : इंडिगोच्या विमानात आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल