ETV Bharat / state

वारकरी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलावर संस्था चालकाने केले अनैसर्गिक कृत्य - alandi news

आळंदी येथील सिद्धबेट परिसरातील एका वारकरी संस्था चालकाने वारकरी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

आळंदी पोलीस ठाणे
आळंदी पोलीस ठाणे
author img

By

Published : May 20, 2021, 9:19 PM IST

Updated : May 20, 2021, 9:31 PM IST

पुणे - आळंदीमधील सिद्धबेट परिसरातील एका वारकरी संस्था चालकाने वारकरी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिवप्रसाद रामनाथ भोकनळ (वय 21 वर्षे, रा. सिद्धबेट, केळगाव मुळ रा. वंडागळी ता. सिन्नर जि.नाशिक) याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

आळंदीत सातत्याने अशा प्रकारच्या घटना उघड होत असल्याने वारकरी शिक्षणाचे धडे शिकण्यासाठी घरदार सोडून येणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी आळंदी परिसरातील खासगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पीडित मुलाला वारकरी शिक्षणासाठी आई-वडिलांनी पाठवले होते. आरोपी शिवप्रसाद भोकनळ हा मुलांना वारकरी संप्रदायासंदर्भात शिक्षण देत होता. दरम्यान, पीडित मुलाच्या घरी पाहुणे आल्याने त्याला आईने घरी आणले होते. तेव्हा, भोकनळ यांनी पीडित मुलाला तातडीने परत संस्थेत पाठवावे, असे सांगितले. यावरून पीडित मुलगा संस्थेत जायचे नाही म्हणून रडायला लागला. आईने मुलाला विश्वासात घेऊन माहिती विचारली असता हा गंभीर प्रकार समोर आला आहे. शिवप्रसादने अनैसर्गिक कृत्य केल्याचे त्या मुलाने आईला सांगितले.

संस्थेतील सर्व मुले हरिपाठ करण्यासाठी चालले होते. तेव्हा, पीडित मुलाला भोकनळने तुझ्याकडे काम आहे असे म्हणून थांबवले. सर्व विद्यार्थी हरिपाठाला गेल्यानंतर त्याला एका खोलीत नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. दरम्यान, पीडित मुलाला याची वाच्यता केल्यास तुला बघून घेईल, अशी धमकी देखील शिवप्रसादने दिली. याप्रकरणी आळंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - सिनेस्टाइल पाठलाग करून चाकण पोलिसांनी जप्त केला शस्त्रसाठा

Last Updated : May 20, 2021, 9:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.