ETV Bharat / state

सिंहगड रस्त्यावर लवकरच होणार उड्डाणपूल - आमदार माधुरी मिसाळ

सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. विठ्ठलवाडी ते माणिकबाग दरम्यान उड्डाणपूल केला जाणार आहे, अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजप आमदार माधुरी मिसाळ
author img

By

Published : Jul 23, 2019, 8:08 PM IST

पुणे - पुणे शहरातल्या सिंहगड रस्ता परिसरातील नागरिक वाहतूक कोंडीच्या समस्येने गेली अनेक वर्षे त्रस्त आहेत. या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने आता विठ्ठलवाडी ते माणिकबाग दरम्यान उड्डाणपूल केला जाणार आहे, अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी कमान ते माणिकबाग दरम्यान उड्डाणपूल होणार असून, त्यासाठी महानगरपालिके तर्फे जिओ टेक्निकल सर्वेक्षण करून अहवाल दाखल करण्यात आला आहे. लवकरच प्रत्यक्ष कामास सुरूवात होईल, असे आमदार मिसाळ यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात या कामासाठी १२५ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध झाली आहे. उड्डाणपुलाचे काम २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजप आमदार माधुरी मिसाळ

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी करण्यासाठी या उड्डाणपुलाचा उपयोग होईल. दरम्यान पुणे शहरात सध्या मेट्रो मार्गाची उभारणी केली जात आहे. मेट्रोच्या पुढील टप्प्यात सिंहगड रस्त्यावर मेट्रो असावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचा अडसर मेट्रोला होईल का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. अगोदरच प्रचंड वाहतूक असलेल्या सिंहगड रस्त्यावर उड्डाणपूल आणि मेट्रो मंजूर झाल्यास मेट्रोची कामे यामुळे नागरिकांना आणखी 4 ते 5 वर्ष वाहतूक कोंडीतून सुटका नाही अशी परिस्थिती दिसते आहे.

Intro:सततचे ट्राफिक जाम आणि वाहतुकीने त्रस्त असलेल्या सिंहगड रस्त्यावर लवकरच होणार उड्डाणपूलBody:
mh_pun_03_sihagad_road_issue_avb_7201348
पुणे शहरातल्या सिंहगड रस्ता परिसरातील नागरिक वाहतूक कोंडीच्या समस्येने गेली अनेक वर्षे त्रस्त आहेत या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने आता विठ्ठलवाडी ते माणिकबाग दरम्यान उड्डाणपूल केला जाणार असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिलीय सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी कमान ते माणिकबाग दरम्यान उड्डाणपूल होणार असून त्यासाठी महापालिकेतर्फे जिओ टेक्निकल सर्वेक्षण करून अहवाल दाखल करण्यात आला आहे. लवकरच प्रत्यक्ष कामास सुरूवात होईल असे आमदार मिसाळ यांनी सांगितले महापालिकेच्या माध्यमातून अंदाजपत्रकात या कामासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध झाली असून उड्डाणपुलाचे काम २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचे सांगत सिंहगड रस्त्यावरील वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी करण्यासाठी या उड्डाणपुलाचा उपयोग होईल असे त्या म्हणाल्या दरम्यान पुणे शहरात सध्या मेट्रो मार्गाची उभारणी केली जातेय मेट्रो च्या पुढील टप्प्यात सिहगड रस्त्यावर ही मेट्रो असावी अशी मागणी नागरिकांकडून केली जातेय त्यामुळे या उड्डाणपुला चा अडसर मेट्रो ला होईल का अशी शंका उपस्थित केली जातेय आधीच प्रचंड वाहतूक असलेल्या सिहगड रस्त्यावर उड्डाणपूल तसेच मेट्रो मंजूर झाल्यास मेट्रो ची कामे यामुळे नागरिकांना आणखी 4 ते 5 वर्ष वाहतूक कोंडीतून सुटका नाही अशी परिस्थिती दिसतेय....
Byte माधुरी मिसाळ आमदार

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.