ETV Bharat / state

चिंतेची बाब..! राज्यात काही दिवस पावसाचा जोर कमी, हवामान विभागाचा अंदाज

येत्या चोवीस तासात कोकण, गोवा परिसरात पावसाची शक्यता आहे. मात्र, त्यानंतरचे पुढील पाच दिवस या भागात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात ही 24 तासात हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील चार ते पाच दिवसात पावसाचा जोर कमी राहील.

हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाचा अंदाज
author img

By

Published : Jun 26, 2021, 8:11 AM IST

पुणे - राज्यात जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाचा जोर कमी राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. सध्या राज्यात मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक अशी अनुकूल स्थिती नसल्याने पाऊस कमी पडेल, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.

हवामान विभागाचा अंदाज

येत्या चोवीस तासात कोकण, गोवा परिसरात पावसाची शक्यता आहे. मात्र, त्यानंतरचे पुढील पाच दिवस या भागात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात ही 24 तासात हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील चार ते पाच दिवसात पावसाचा जोर कमी राहील. 25 जूनला राज्यातील विदर्भासह अनेक भागात पाऊस राहील. 26 तारखेनंतर विदर्भात पावसाचा जोर कमी राहील.

या आठवड्यात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्‍यता असून काही ठिकाणी अलर्ट देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात येत्या 4 ते 5 दिवसात ढगाळ वातावरण राहील. मात्र, पावसाची शक्यता कमी आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर कमी राहील. 25 जून ते १ जुलै हा आठवडा कमी पावसाचा असेल असाही हवामान विभागाचा अंदाज आहे.

हेही वाचा - Mumbai Rains : पावसाचा मेल-एक्स्प्रेसला फटका; मुंबईतून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.