ETV Bharat / state

कात्रज चौकात चालकाविना धावली पीएमपी, सुदैवाने जीवितहानी नाही - कात्रज परिसर बातमी

मंगळवारी सकाळच्या सुमारास कात्रज परिसरात पीएमपी बस ही कात्रज ते हाउसिंग बोर्ड या मार्गाने जाण्यासाठी स्वारगेटच्या दिशेने तोंड करून उतारावर उभी होती. बसचे चालक पिराजी दिवटे हे वाहकाला बोलवण्यासाठी गाडी सोडून खाली उतरले. सुदैवाने कोणीही प्रवासी बसमध्ये बसलेले नव्हते. त्यानंतर अचानक ही बस पुढे सरकली आणि रस्त्यावर उभ्या असणाऱ्या दोन रिक्षांवर जाऊन आदळली. रिक्षात असणारे दोघे यावेळी जखमी झाले तर रिक्षाचेही नुकसान झाले आहे.

कात्रज चौकात चालकाविना धावली पीएमपी
कात्रज चौकात चालकाविना धावली पीएमपी
author img

By

Published : Feb 26, 2020, 9:24 AM IST

पुणे - येथील कात्रज परिसरात चालकाच्या हलगर्जीपणामुळे चालकाविना पीएमपी बस धावल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी घडला. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोघे रिक्षा चालक या अपघातामध्ये जखमी झाले आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नेहमीप्रमाणेचे मंगळवारी सकाळी ७ दरम्यान कात्रज चौकात विद्यार्थी, भाजीवाले, नोकरदार यांची मोठी वर्दळ होती. कात्रज पीएमपी डेपोतून पीएमपीची (एमएच १४ सीडब्लू,१७४४) बस कात्रज ते हाउसिंग बोर्ड या मार्गाने जाण्यासाठी स्वारगेटच्या दिशेने तोंड करून उतारावर उभी होती. बसचे चालक पिराजी दिवटे हे वाहकाला बोलवण्यासाठी गाडी सोडून खाली उतरले. सुदैवाने कोणीही प्रवासी बसमध्ये बसलेले नव्हते. त्यानंतर अचानक ही बस पुढे सरकली आणि रस्त्यावर उभ्या असणाऱ्या दोन रिक्षांवर जाऊन आदळली. रिक्षात असणारे दोघे यावेळी जखमी झाले तर रिक्षाचेही नुकसान झाले आहे.

हेही वाचा - 'गृहमंत्र्यांना देशाच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे जमत नसेल तर, त्यांनी राजीनामा द्यावा'

या रिक्षांना धडकल्यानंतर बस कात्रजच्या मुख्य चौकाकडे जाऊ लागली. यावेळी रस्त्यावरील आणि आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा करत पळ काढला. काही रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा या बसच्या मार्गातून बाजूला केल्या. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या दिगंबर कोराळे या टॅक्सी ड्रायव्हरने आपल्या जीवाची पर्वा न करता पाठीमागच्या दारातून धावत्या पीएमटीमध्ये प्रवेश केला आणि ब्रेक दाबून गाडी थांबवली. दिगंबर कोराळे यांनी दाखवलेल्या साहसमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या दुर्घटनेला जबाबदार असणार असणाऱ्यांवर पोलीस आणि पीएमपी प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा - बांगलादेशी नागरिक प्रकरण: पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.