पुणे - शिक्रापूर येथे पोहायला गेलेल्या १४ वर्षीय मुलगा पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) दुपारच्या सुमारास घडली आहे.
स्थानिक नागरिक व पोलीसांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या मुलाचा शोध सुरु आहे. अमर राधाकिशन तायड (वय १४ वर्षे), असे पाण्यात बुडालेल्या मुलाचे नाव आहे
अमर हा मुळचा बीड जिल्ह्यातील असून आई-वडील कामानिमित्त शिक्रापूर येथे वास्तव्यास आहे. अमर व त्याचे दोन मित्र शिक्रापूर जवळील एलएनटी फाटा येथे पोहायला गेले असताना अमर अचानक पाण्यात बुडाला.
स्थानिक नागरिक व पोलीसांच्या मदतीने अमरचा शोध सुरु आहे. मात्र, शोधकार्यात अजून यश मिळत नसल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.