पुणे - जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातुन हजारो भाविकांसह देहू येथे दिंड्या दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने परिसरात नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यावर्षी पहिल्यांदाच ड्रोनद्वारे विद्युत रोषणाईचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
हेही वाचा - 'चिकन अन् अंडी हे तर पौष्टीक पदार्थ.. बिनधास्त खा, अफवांवर विश्वास ठेऊ नका!'
अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या या सोहळ्याठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातपुन हजारो भाविकांसह दिंड्या देहु येथे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. या सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दाखल होतात. सोमवारी देहू नगरीच्या प्रवेशद्वारावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण देहू नगरी वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाच्या वादनाने आणि विठुनामाच्या गजराने दुमदुमून गेली आहे. या वर्षी संत श्री तुकाराम महाराजांचा हा ३७२ हा बीज उत्सव सोहळा आहे. या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोरोना विषाणूमुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे. कोरोना विषाणूचा कुठलाही परिणाम या सोहळ्यावर होणार नसल्याचे विश्वस्त मंडाळाने स्पष्ट केले आहे. यावर्षी पहिल्यांदाच ड्रोनद्वारे परिसरातील विद्युत रोषणाईचे चित्रीकरण करण्यात आले असून, या विद्युत रोषणाईने संपूर्ण देहू नगरी उजळून निघाल्यासारखी दिसत आहे.