पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. शुक्रवारी दिवसभरात नव्याने ९८ कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १,११० वर पोहचली आहे. यांपैकी, महानगरपालिकेच्या हद्दीत ५४४, तर हद्दीबाहेरील ८२ जण करोनामुक्त झालेले आहेत. तर, एकूण ३७ कोरोना रुग्णांचा आतापर्यंत बळी गेला आहे.
शुक्रवारी दिवसभरात २८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आज आढळलेले ९८ रुग्ण हे जुनी सांगवी, अजंठानगर, संत तुकारामनगर भोसरी, बेलठिकानगर थेरगाव, गुलाबनगर दापोडी, साईबाबा नगर चिंचवड, नानेकरचाळ पिंपरी, पवारवस्ती दापोडी, श्रीदत्त कॉलनी थेरगाव, काळेवाडी, संजय गांधी नगर पिंपरी, नेहरुनगर, त्रिवेणीनगर, यमुनानगर, भिमनगर पिंपरी, दत्तनगर दिघी, जयभीमनगर दापोडी, आनंदनगर, सिदार्थनगर दापोडी, वैष्णवदेवी मंदीर पिंपरी, चिखली, रमाबाई नगर, बौध्दनगर पिंपरी, जाधववाडी चिखली, मिलिंदनगर पिंपरी, अंकुश चौक निगडी, शिवतिर्थनगर काळेवाडी, पोलीस कॉलनी वाकड, जयमालानगर सांगवी, सुदर्शनगर पिंपळे गुरव, आंबेडकर वसाहत औंध आणि जुन्नर येथील रहिवासी आहेत.
तर, आनंदनगर नेहरुनगर, साईनाथनगर निगडी, महात्माफुलेनगर वाय.सी.एम, नानेकर चाळ पिंपरी, मोरवाडी, पिंपळे गुरव, दत्तनगर वाकड, दापोडी, सद्गुरु कॉलनी वाकड, नेहरुनगर, रुपीनगर, पवार वस्ती दापोडी, रमाबाईनगर पिंपरी आणि थरमॅक्स चौक येथील रहिवासी असलेल्या कोविड-१९ बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हेही वाचा : पुणे रेल्वे स्टेशनवर स्क्रिनिंगसाठी मल्टी टास्किंग कॅप्टन अर्जुन रोबोचे उद्घाटन