ETV Bharat / state

पुणे विभागातील 9 हजार 105 कोरोनाबाधित ठणठणीत; एकूण बाधितांची संख्या 14 हजार 650 - कोरोना अहवाल पुणे विभाग

पुणे विभागात 271 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.15 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Corona update Pune division
Corona update Pune division
author img

By

Published : Jun 13, 2020, 7:02 PM IST

पुणे- विभागातील 9 हजार 105 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14 हजार 650 झाली आहे. तर अ‌ॅक्टिव्ह रुग्ण 4 हजार 887 आहे. विभागात 658 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागात 271 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.15 टक्के आहे, अशी माहितीही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. यापैकी पुणे जिल्ह्यात 11 हजार 397 कोरोनाबाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 7 हजार 110 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 3 हजार 811 आहे.

कोरोनाबाधित एकूण 476 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 263 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.38 टक्के आहे.

शुक्रवारच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 573 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 424, सातारा जिल्ह्यात 14, सोलापूर जिल्ह्यात 108, सांगली जिल्ह्यात 21, तर कोल्हापूर जिल्ह्यात 6 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यात 718 कोरोनाबाधित रुग्ण असून 472 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 215 आहे. कोरोनाबाधित 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 612 कोरोनाबाधित रुग्ण असून 814 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 661 आहे. कोरोनाबाधित 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यात 213 कोरोनाबाधित रुग्ण असून 106 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 101 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 710 कोरोनाबाधित रुग्ण असून 603 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 99 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 1 लाख 14 हजार 118 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 10 हजार 148 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 980 नामुन्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 95 हजार 241 नामुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 14 हजार 650 नामुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.