पिंपरी चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवड शहरात आठ वर्षीय मुलाने बाहुलीला गळफास देऊन स्वतः त्या प्रमाणे तोंडावर टॉवेल ठेवून गळफास घेतला ( 8 year Boy Commits Suicide ) आहे. ही धक्कादायक घटना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मयत मुलाने मोबाईल वरील हॉरर व्हिडिओ पाहून आत्महत्या केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तेव्हा आई कामावर गेली होती, तर भावंड घराबाहेर खेळत होते. अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी अडीच वाजता घरात एकट्या असलेल्या आठ वर्षीय मुलगा बाहुलीसोबत खेळत होता. त्याने बाहुलीच्या तोंडावर कपडा टाकून गळफास दिला, मग स्वतः देखील तसेच अनुकरण केले अन तोंडावर कापड टाकून गळफास घेऊन आत्महत्या केली. तेव्हा आई कामावर होती तर भावंड घराबाहेर खेळत होते. वडील त्याच ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. मोबाईलवरील व्हिडिओ पाहून अशा प्रकारचे कृत्य केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दुर्दैवाने या घटनेत आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. आई काम संपवून खालच्या मजल्यावर आली. तेव्हा मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. असे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांचे पालकांना आवाहन - पालकांनी डोळ्यात अंजन घालून मुलांकडे लक्ष द्यायला हवे असे आवाहन पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी केलं आहे. मुलं काय पाहतात? ते देखील वेळोवेळो तपासायला हवं अस त्यांनी सांगितले आहे.
मानसोपचार तज्ञ डॉ. गौरव वडगावकर यांनी सांगितले की, लहान मुले ही अनुकरण करतात. त्यामुळे आपली मुले मोबाईलवर काय पाहतात. काय करत आहेत याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होत असतो. त्यामुळे आपली मुळे मोबाईलवर काय करत आहेत, हे नेहमी पाहिले पाहिजे. त्यांना विध्वंसक किंवा उत्तेजन पर व्हिडिओपासून दूर ठेवले पाहिजे. असे सांगितले.