पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरातील कोरोना बाधित रुग्णांनी 70 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज (दि. 20 सप्टें.) नव्या 749 कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 151 जणांना कोरोनातून बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांनी 70 हजारांचा टप्पा ओलांडला असून एकूण संख्या 70 हजार 172 वर पोहोचली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांनी 70 हजारांचा टप्पा ओलांडला असून दिवसेंदिवस बाधित रुग्णांची वाढत असल्याचे चित्र शहरात आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील 56 हजार 99 जण कोरोनातून बरे झाले असून महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजार 375 एवढी आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. आत्तापर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 142 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला असून ग्रामीण भागातील मात्र पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 365 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील बाधित रुग्णांची आकडेवारी कमी झाली आहे. पण, कोरोना नियंत्रणात आला आहे, असे म्हणता येणार नाही. दुसरीकडे शहरातील मृतांचा एकडा वाढत असून मृत्यू दर कमी करण्याचे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागासमोर आव्हान आहे.
हेही वाचा - पिंपरीमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; महिलेसह 5 जणांना अटक