ETV Bharat / state

भाजी विक्रीसाठी वापरली जातेय 'ही' अलिशान गाडी; ७० वर्षीय आजीची अनोखी शक्कल - 70 वर्षीय महिला भाजी विक्रेता

एका आलिशान मोटारीतून एक ७० वर्षीय आजी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. सुमन निवृत्ती भरणे असे या आजीचे नाव आहे. सुमन भरणे यांना त्यांचा मुलगा संदीप हे मदत करतात.

भाजी विक्रीचा व्यवसाय
भाजी विक्रीचा व्यवसाय
author img

By

Published : Jan 11, 2020, 12:09 PM IST

Updated : Jan 11, 2020, 2:24 PM IST

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात एका आलिशान मोटारीतून एक ७० वर्षीय आजी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. सुमन निवृत्ती भरणे असे या आजीचे नाव आहे. सुमन भरणे यांना त्यांचा मुलगा संदीप हे मदत करतात. दररोज किमान पाच हजार रुपयांचा व्यवसाय हे माय-लेक करतात.

सुमन भरणे या पहाटेच शेतात जातात. सुनांच्या मदतीने शेतातील ताजी भाजी आणून स्वच्छ करून घेतात. त्यानंतर सायंकाळी इनोव्हा गाडीतून शहरातील सांगवी, औंध, पाषाण, हिंजवडी या ठिकाणी भाजी विकण्यासाठी जातात. सुरुवातीला त्या टेम्पोमधून भाजी विकत. कालांतराने त्यांच्या मुलाने टेम्पो विकून इनोव्हा घेतली.

हेही वाचा - राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालयाला १०० वर्ष पूर्ण; मात्र, जागेअभावी दुर्मिळ वस्तू नागरिकांच्या दृष्टीआड

सुमन भरणे मागील तीस वर्षांपासून शेती व्यवसाय करतात. त्याच्या सोबत भाजीविक्रीही करतात. भरणे कुटुंबात ऐकून १५ सदस्य आहेत त्यांच्या सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह भाजीपाल्यावरच चालतो. योग्य पद्धतीने शेती केली तर त्यातून नक्कीच फायदा होतो. शेतकरी असल्याचा अभिमान आहे, असे संदीप भरणे यांनी सांगितले.

आलिशान मोटारीतून भाजी विक्रीचा व्यवसाय

भरणे कुटुंबीय आपल्या 15 एकर शेतीमध्ये मेथी, कोथिंबीर, पालक, मुळा यासारख्या भाज्यांचे उत्पादन घेतात. सेंद्रिय खतांचा वापर करून पिकवलेल्या ताज्या भाजीपाल्याला ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सुमन भरणे यांनी सांगितले.

Intro:mh_pun_02_avb_70_year_grandmother_mhc10002Body:mh_pun_02_avb_70_year_grandmother_mhc10002

Anchor:- पिंपरी-चिंचवड शहरात एका आलिशान मोटारीतून एक ७० वर्षीय आजी भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. हे सर्व पाहून शहरातील नागरिक मात्र अवाक झाले आहेत. सुमन निवृत्ती भरणे असे आजी चे नाव असून त्यांना व्यवसायात संदीप भरणे हे मदत करतात. दररोज किमान पाच हजार रुपयांचा व्यवसाय दोघे ही मायलेकर करतात. सकाळी भाजी स्वच्छ धुवून सायंकाळी सांगवी, हिंजवडी, पाषाण, औंध अश्याया ठिकाणी नेऊन विकली जाते. भरणे कुटुंबात ऐकून १५ सदस्य आहेत.

सत्तर वर्षीय आजी सुमन भरणे या पहाटे झोपेतून उठून शेतात जातात. आजी आणि सुना शेतात ताजी भाजी आणून स्वच्छ धुवून घेतात. त्यानंतर एक गाठोड्यात भाजी बांधून सायंकाळी इंनोव्हा मोटारीतून शहरातील सांगवी, औंध, पाषाण, हिंजवडी या ठिकाणी मोटारीतून भाजी विकतात. दरम्यान, सुमन आजी गेल्या तीस वर्षापासून शेती व्यवसाय करतात. त्यांचा मूळ व्यवसाय हा शेतीच आहे. टेम्पोमधून शेतीतील भाजी मिळेल त्या ठिकाणी विकत. मात्र, त्यानंतर टेम्पो विकून इनोव्हा घेतली आणि त्यातच भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. यामुळे भाजी चा व्यवसाय वाढल्याचे सुमन सांगतात.

भरणे कुटुंबात ऐकून १५ सदस्य आहेत त्यांचं सर्व कुटुंब भाजी व्यवसायावर उदरनिर्वाह चालतो. मुलगा संदीप भरणे हे आई सुमन यांना भाजी व्यवसायात मदत करतात. मी शेतकरी असल्याचा अभिमान आहे असं संदीप भरणे सांगतात. १५ एकर शेतात मेथी, कोथिंबीर, पालक, मुळा आदी भाजा पिकवल्या जातात. त्यामुळे आजी करत असलेल्या व्यवसाय हा खरच अधिक फुलत राहो.

बाईट:- सुमन भरणे- भाजी विक्रेत्या

बाईट:- संदीप भरणे- मुलगा

बाईट:- वैशाली भरणे- सून

Conclusion:
Last Updated : Jan 11, 2020, 2:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.