ETV Bharat / state

तळेगाव परिसरातून ६००पेक्षा अधिक परप्रांतीय मजूर मूळ राज्यात रवाना

पुणे जिल्ह्यातील बहुतांश भाग 'कामगार नगरी' म्हणून ओळखला जातो. त्यात पिंपरी-चिंचवड, चाकण, मावळ हा परिसर येत असून मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजूर स्थायिक झाले होते. परंतु, कोरोना विषाणूने थैमान घातले असून, याचा थेट परिणाम कामगारांच्या जीवनावर झाला आहे.

migrant workers
तळेगाव परिसरातून ६०० पेक्षा अधिक परप्रांतीय मजूर मूळ राज्यात रवाना
author img

By

Published : May 21, 2020, 8:20 PM IST

पुणे - जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक परप्रांतीय मजुरांना लॉकडाऊन फटका बसला आहे. तळेगाव, मावळ या परिसरातील तब्बल ६००पेक्षा अधिक मजुरांना छत्तीसगड आणि झारखंड या राज्यात पुणे स्थानक येथून रवाना करण्यात आले. यावेळी तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी महानगर पालिकेच्या बसमध्ये बसवून त्यांना पुण्याच्या रेल्वे स्थानकात सोडले.

तळेगाव परिसरातून ६०० पेक्षा अधिक परप्रांतीय मजूर मूळ राज्यात रवाना
पुणे जिल्ह्यातील बहुतांश भाग 'कामगार नगरी' म्हणून ओळखला जातो. त्यात पिंपरी-चिंचवड, चाकण, मावळ हा परिसर येत असून मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजूर स्थायिक झाले होते. परंतु, कोरोना विषाणूने थैमान घातले असून, याचा थेट परिणाम कामगारांच्या जीवनावर झाला आहे. काम केल्यामुळे दोन वेळ जेवण मिळायचे. मात्र, लॉकडाऊन असल्याने कंपन्याच बंद होत्या. सध्या प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानंतर कंपन्या सुरू झाल्या. मात्र, कामगार मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मावळ आणि तळेगाव परिसरात असणारे शेकडा परप्रांतीय मजुरांनी गावाची वाट धरली आहे. याला स्थानिक तळेगाव पोलिसांनी सहकार्य केले असून, त्यांना बसद्वारे पुणे स्थानक येथे सोडवल्यानंतर त्यांना रेल्वेने मूळ राज्यात रवाना करण्यात आले. तळेगाव पोलिसांच्या वतीने कामगारांना पाण्याच्या बॉटल्स आणि आवश्यक वस्तू देण्यात आल्या. यावेळी रस्त्यावर उभे राहून सर्व मजुरांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी निरोप दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.