ETV Bharat / state

भोसरी परिसरात वाहनांची तोडफोड करणारे ६ जण जेरबंद - भोसरी पोलीस स्टेशन न्यूज

अभिषेक युवराज कांबळे (वय - २० ), अनिकेत श्रीधर कोपरे (वय - १९ ), अमोल कैलास ढेंगळे ( वय - १९ ), अक्षय राजेंद्र पवार ( वय - १९ ) , सूरज नारायण शर्मा ( वय - १९ ), अमोल शांताराम नीतोने ( वय - १९ ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

bhosari vehicles vandalism incident 6 Arrested
भोसरी परिसरात वाहनांची तोडफोड करणारे ६ जण जेरबंद
author img

By

Published : Jun 16, 2020, 8:17 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. तीन दिवसांपूर्वी भोसरीमध्ये टोळक्याने धुडगूस घालत आठ वाहनांची तोडफोड केली होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तसेच पोलीस आरोपींचा शोध घेत होते.

वाहनांची मोडतोड करतानाची दृश्य...
अभिषेक युवराज कांबळे (वय - २० ), अनिकेत श्रीधर कोपरे (वय - १९ ), अमोल कैलास ढेंगळे ( वय - १९ ), अक्षय राजेंद्र पवार ( वय - १९ ) , सूरज नारायण शर्मा ( वय - १९ ), अमोल शांताराम नीतोने ( वय - १९ ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीच्या दिघी रोड परिसरात अज्ञात टोळक्याने दहशत पसरवत आठ वाहनांची तोडफोड केली होती. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या सीसीटीव्ही फुटेजवरून भोसरी पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली या तपासाला सुरुवात झाली.

तेव्हा, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलासे यांच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी समीर रासकर आणि सुमित देवकर यांनी ६ आरोपींना अटक केली. दरम्यान, आरोपींनी वाहनाची तोडफोड केली असल्याची कबुली दिली आहे.

हेही वाचा - वेतनवाढीसाठी पदवीधारकसह पदव्युत्तर डॉक्टरांचे काळ्या फिती लावून आंदोलन

हेही वाचा - पुणे विभागात 365 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, आतापर्यंत 9 हजार 778 जण कोरोनामुक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.