पुणे - पिंपरी-चिंचवड आज (गुरुवारी) शहरात दिवसभरात तब्बल ५८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ८ रुग्ण हे शहराबाहेरील परिसरातील आहेत, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तर एका कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शहरातील बाधितांचा आकडा ६३४ वर पोहचला आहे.
शहराला रेड झोनमधून वगळण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचे पहायला मिळाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात महानगर पालिकेने अटी आणि शर्तीसह दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे अनेक परिसरात गर्दी झाली. त्यामुळे तेथील परिसर काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले होते.
दरम्यान, गुरुवारी सर्वाधिक ५८ कोरोना बाधित शहरात आढळले आहेत. तर ४७ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत तब्बल ३६६ शहरातील तर ४६ शहराबाहेरील व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. मृतांचा आकडा हा २६ वर पोहचला आहे.
'या' परिसरात आढळले कोरोनाबाधित -
गुरुवारी पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे वाकड, पिंपरी, सांगवी, आनंदनगर, फुलेनगर, इंदिरानगर, दापोडी, मामुर्डी, अजंठानगर, चऱ्होली, भोसरी, ताथवडे, देहुरोड, पिंपळे गुरव, चिंचवड स्टेशन, चिखली, मंचर, खडकी, खेड, आंबेगाव व जुन्नर येथील रहिवासी आहेत. तर मृत झालेला ४५ वर्षीय व्यक्ती हा दापोडी येथील रहिवासी होता.
‘या’ परिसरातील नागरिक झाले कोरोनामुक्त -
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, वाकड, खराळवाडी, आनंदनगर, किवळे, सांगवी, रुपीनगर, थेरगाव, भाटनगर, काळेवाडी, वाल्हेकरवाडी, बौध्दनगर आणि आंबेगाव येथील रहिवासी असलेले कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यांची तब्येत चांगली असल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये ५८ कोरोनाबाधित आढळले; ४६ जणांना मिळाला डिस्चार्ज - पिंपरी-चिंचवड एकूण कोरोनाबाधित
पिंपरी-चिंचवड गुरुवारी सर्वाधिक ५८ कोरोना बाधित शहरात आढळले आहेत. तर ४७ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत तब्बल ३६६ शहरातील तर ४६ शहरा बाहेरील व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.