ETV Bharat / state

पुण्यातील अग्निशामक यंत्रणा 'गॅस'वर; 55 टक्के जागा रिक्त

भंडारा जळीतकांड असो किंवा पुणे शहरातील सिरम इन्स्टिट्यूट सारख्या आगीच्या घटना असो, अशा प्रत्येक घटनेत अग्निशामक दल हा महत्वाचा विषय आहे. पुणे शहरातील अग्निशामक विभागात 55 टक्के रिक्त पदे असून केवळ 45 टक्केच मनुष्यबळाच्या जोरावर काम सुरू आहे.

PMC fire department
पीएमसी अग्निशामक विभाग
author img

By

Published : Feb 11, 2021, 12:35 PM IST

पुणे - महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागात मंजूर असलेल्या 910 पदांपैकी 513 कर्मचारी पदे रिक्त आहेत. त्यामुळे शहरातील अग्निसुरक्षाच 'गॅस'वर असल्याची स्थिती आहे. या जागा भरण्यासाठीची नियमावली गेल्या 7 वर्षापासून राज्याच्या नगरविकास विभागाकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहे. त्याचे चटके मात्र, शहराच्या अग्निशामक सेवेला बसत असून आगीची मोठी दुर्घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थितीत तातडीने धावून जाण्यासाठी अग्निशामक कर्मचारी उपलब्ध नसल्याचे दुर्दैवी वास्तव समोर आले आहे.

पीएमसी अग्निशामक विभागात ५५ टक्के जागा रिक्त आहेत
भंडारा जिल्ह्यात लागलेल्या आगीच्या घटनेनंतर राज्यातील अग्निसुरक्षेचा विषय ऐरणीवर आला. त्यानंतर पुन्हा सिरम इन्स्टिट्यूटमध्ये देखील मोठी आग लागली. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत किंवा घटनेनंतर कमीत-कमी हानी व्हावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अग्निशामक दलात पुरेसे कुशल कर्मचारी असणे अपेक्षित आहे. मात्र, पुणे महानगरपालिकेत फक्त 45 टक्केच कर्मचारी उपलब्ध आहेत.
2014पासून कर्मचारी भरतीच नाही -

पुणे महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागात 2014 पासून भरती झालेली नाही. त्या अगोदर भरती झालेल्या कर्मचारी संख्येमध्येच काम करावे लागत आहे. अग्निशामक दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी अग्निशामक सेवा संचालनालयाने मार्च 2018 मध्ये आदर्श सामायिक सेवा प्रवेश नियमावली तयार केली. ही नियमावली नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी सादर केली. मात्र, या नियमावलीला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे अग्निशामक विभागातील भरती रखडली आहे. परिणामी पुणे महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागात 55 टक्के रिक्त पदे भरण्यात अडचणी येत असून अवघ्या 45 टक्के कर्मचाऱ्यांच्या जोरावरच हा विभाग चालवावा लागत आहे, अशी माहिती अग्निशामक दलाचे मुख्य अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली.

बचाव कार्याला बसू शकतो फटका -

एका केंद्रावर किमान नऊ ते दहा कर्मचारी असणे अपेक्षित आहे. मात्र, पुणे शहरात कमी मनुष्यबळ आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावरच काम कराव लागत आहे. एखाद्या उंच इमारतीतील आग शमवण्यासाठी लागणारी शिर्डी उचलण्यासाठी चार कर्मचारी लागतात. मात्र, काही केंद्रावर केवळ तीन ते चार कर्मचारी उपलब्ध असतात. दुर्दैवाने एकाच वेळी तीन ते चार ठिकाणी आग लागल्यास पुरेशा कर्मचाऱ्यांच्या अभावी मदत व बचाव कार्याला फटका बसू शकतो, अशी भीती रणपिसे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांना पत्र -

पुणे महानगरपालिकेतील अग्निशामक विभागातील रिक्त पदे भरण्यासाठीची नियमावली तातडीने मंजूर करण्यात यावी, असे पत्र सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. पुणे शहर आगीच्या बाबतीत संवेदनशील शहर आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील शहर मोठे आहे. पुणे शहरातील अग्निशामक दलात 55 टक्के जागा रिक्त असणे ही अत्यंत धोकादायक बाब आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवले आहे, अशी माहिती विवेक वेलणकर यांनी दिली.

पुणे - महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागात मंजूर असलेल्या 910 पदांपैकी 513 कर्मचारी पदे रिक्त आहेत. त्यामुळे शहरातील अग्निसुरक्षाच 'गॅस'वर असल्याची स्थिती आहे. या जागा भरण्यासाठीची नियमावली गेल्या 7 वर्षापासून राज्याच्या नगरविकास विभागाकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहे. त्याचे चटके मात्र, शहराच्या अग्निशामक सेवेला बसत असून आगीची मोठी दुर्घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थितीत तातडीने धावून जाण्यासाठी अग्निशामक कर्मचारी उपलब्ध नसल्याचे दुर्दैवी वास्तव समोर आले आहे.

पीएमसी अग्निशामक विभागात ५५ टक्के जागा रिक्त आहेत
भंडारा जिल्ह्यात लागलेल्या आगीच्या घटनेनंतर राज्यातील अग्निसुरक्षेचा विषय ऐरणीवर आला. त्यानंतर पुन्हा सिरम इन्स्टिट्यूटमध्ये देखील मोठी आग लागली. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत किंवा घटनेनंतर कमीत-कमी हानी व्हावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अग्निशामक दलात पुरेसे कुशल कर्मचारी असणे अपेक्षित आहे. मात्र, पुणे महानगरपालिकेत फक्त 45 टक्केच कर्मचारी उपलब्ध आहेत.2014पासून कर्मचारी भरतीच नाही -

पुणे महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागात 2014 पासून भरती झालेली नाही. त्या अगोदर भरती झालेल्या कर्मचारी संख्येमध्येच काम करावे लागत आहे. अग्निशामक दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी अग्निशामक सेवा संचालनालयाने मार्च 2018 मध्ये आदर्श सामायिक सेवा प्रवेश नियमावली तयार केली. ही नियमावली नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी सादर केली. मात्र, या नियमावलीला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे अग्निशामक विभागातील भरती रखडली आहे. परिणामी पुणे महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागात 55 टक्के रिक्त पदे भरण्यात अडचणी येत असून अवघ्या 45 टक्के कर्मचाऱ्यांच्या जोरावरच हा विभाग चालवावा लागत आहे, अशी माहिती अग्निशामक दलाचे मुख्य अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली.

बचाव कार्याला बसू शकतो फटका -

एका केंद्रावर किमान नऊ ते दहा कर्मचारी असणे अपेक्षित आहे. मात्र, पुणे शहरात कमी मनुष्यबळ आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावरच काम कराव लागत आहे. एखाद्या उंच इमारतीतील आग शमवण्यासाठी लागणारी शिर्डी उचलण्यासाठी चार कर्मचारी लागतात. मात्र, काही केंद्रावर केवळ तीन ते चार कर्मचारी उपलब्ध असतात. दुर्दैवाने एकाच वेळी तीन ते चार ठिकाणी आग लागल्यास पुरेशा कर्मचाऱ्यांच्या अभावी मदत व बचाव कार्याला फटका बसू शकतो, अशी भीती रणपिसे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांना पत्र -

पुणे महानगरपालिकेतील अग्निशामक विभागातील रिक्त पदे भरण्यासाठीची नियमावली तातडीने मंजूर करण्यात यावी, असे पत्र सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. पुणे शहर आगीच्या बाबतीत संवेदनशील शहर आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील शहर मोठे आहे. पुणे शहरातील अग्निशामक दलात 55 टक्के जागा रिक्त असणे ही अत्यंत धोकादायक बाब आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवले आहे, अशी माहिती विवेक वेलणकर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.