ETV Bharat / state

दिवे घाट अपघात प्रकरण; मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखाची मदत जाहीर - सोपान महाराज नामदास

सासवड-पुणे रस्त्यावरील दिवेघाटात नामदेव महाराज पालखी सोहळा जात असताना या दिंडीत जेसीबी घुसल्याने 6 वारकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेत मृत्यू झालेल्या दोन्ही मृतांच्या नातेवाईकांना 'आपदा' ट्रस्टच्या माध्यमातून प्रत्येकी ५ लाख रुपये मदत देणार असल्याची घोषणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.

दिवे घाट अपघात प्रकरण
author img

By

Published : Nov 20, 2019, 12:09 PM IST

पुणे - राज्यात आता कुणाचेही सरकार नाही. मात्र, भाजपने गेल्या काही वर्षांपूर्वी दुर्घटना झाल्यानंतर मदत करण्यासाठी 'आपदा' नावाचा ट्रस्ट बनवला आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत देणार असल्याची घोषणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. दोन्ही मृतांच्या नातेवाईकांचे तपशील मिळाल्यानंतर प्रदेश कार्यालयातून त्यांना लगेच धनादेश देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

दिवे घाट अपघात प्रकरणी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याला सोमवारी सकाळी दिवे घाटात अपघात झाला. ब्रेकफेल झालेला एक जेसीबी सरळ वारकऱ्यांच्या अंगावर गेला. यामध्ये संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज नामदास (३६), आणि वारकरी अतुल महाराज आळशी (२४) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, १६ वारकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हडपसर येथील नोबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - सोपान महाराजांवर हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत इंद्रायणी घाटावर अंत्यसंस्कार

या अपघातातील ५ जणांची प्रकृती अजूनही चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शिवाय १६ जखमींवर उपचार झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली. जखमी झालेल्या सर्वांचा उपचाराचा खर्च, घरी गेल्यानंतरचा औषधोपचाराचा खर्च भाजप करणार असल्याचे ते म्हणाले. वारीसोबत पोलीस संरक्षण असले पाहिजे ही वारकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. तर, सरकार आल्यानंतर याचा विचार केला जाईल असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.

हेही वाचा - दिवे घाटामध्ये दिंडीत घुसला जेसीबी; संत नामदेव महाराजांच्या वंशजासह एक वारकरी ठार

Intro:...Body:...Conclusion:...
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.