पुणे - आज देशभर ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. या दिनानिमित्त देशात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रजासत्ताक दिनानिममित्त पुण्यातील झिल एज्युकेशन सोसायटीच्या ४ हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत तिरंग्यासह छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, तानाजी मालुसरे यांचे भव्य चित्र साकारुन योध्यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली.
या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या वतीने मानवी प्रतिमा साकारून राष्ट्रप्रेम आणि स्वराज्यासाठी जिवाचं रान करणाऱ्याप्रती कृतज्ञतेचा संदेश दिला आहे.
भारताचा ७१वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राजधानी दिल्लीसह विविध राज्यांमध्ये यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, राजपथावर देशाच्या सामर्थ्याचे आणि सांस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध राज्यांचे चित्ररथ आणि भारतीय सैन्य दलांचे जवान आपले सामर्थ्य जगाला दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. यंदाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ब्राझिलचे राष्ट्रपती जेर मेसिअस बोलसोनारो हे राजपथावर उपस्थित आहेत.