ETV Bharat / state

शिरुर तालुक्यात चोरांचा धुमाकूळ; एका गावातील ४ दुकाने फोडली तर एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

author img

By

Published : Sep 5, 2019, 2:10 PM IST

चोरट्यांनी आज मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील टाकळी हाजी गावामध्ये चार दुकाने फोडली. तर मलठण गावामध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने परिसरातील नागरिक जागे झाल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले चोरटे

पुणे- जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ माजवला आहे. चोरट्यांनी आज मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील टाकळी हाजी गावामध्ये चार दुकाने फोडली आहेत तर मलठण गावामध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने परिसरातील नागरिक जागे झाल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हेच ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले चोर

शिरूर तालुक्यात या आठवड्यातील चोरीची ही तिसरी घटना असून दोन दिवसांपूर्वीच चोरट्यांनी जांबूत या ठिकाणी तीन दुकाने फोडली होती तर पिंपरखेड या ठिकाणी सहा दुकाने फोडली होती. रात्रीच्या सुमारास सुनसान परिसर पाहात चोरटे पाळत ठेवून चोरी करतात. यामध्ये चोरी करताना दरोडेखोरांकडून नागरिकांना मारहाण देखील होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सातत्याने सुरु असलेल्या चोरीच्या घटना रोखण्याचे मोठे आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

Intro:Anc__पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून चोरट्यांनी आज मध्यरात्रीच्या सुमारास शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावांमध्ये चार दुकाने फोडली आहेत तर मलठण गावामध्ये चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला आहे हा चोरीचा थरार सीसीटिव्ही कँमेरात कैद झाला आहे..
सुदैवाने परिसरातील नागरिक जागे झाल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला आहे.

शिरूर तालुक्यात आठवडात चोरीची ही तिसरी घटना घडली असून दोन दिवसापूर्वीच चोरट्यांनी जांबुत या ठिकाणी तीन दुकाने फोडली तर पिंपरखेड या ठिकाणी सहा दुकाने फोडली होती त्यामुळे चोरट्यांच्या भितीने सध्या तालुक्यात भितीचे वातावरण झाले आहे..

रात्रीच्या सुमाराम सुमसाण परिसर पहात चोरटे पाळत ठेवुन चोरी करत असुन यामध्ये चोरी करताना दरोडेखोरांकडुन नागरिकांना मारहाणही होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे सातत्याने सुरु असलेल्या चोरीच्या घटना रोखण्याचे मोठं आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांपुढे असणार आहे.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.