ETV Bharat / state

भोसरीमध्ये रोहित्राचा स्फोट, 4 महिन्यांच्या चिमुकलीसह आजीचा मृत्यू - ऑइल अंगावर उडाल्याने मृत्यू

घटनेनंतर सर्व जखमींना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, आज पहाटे उपचारादरम्यान चिमुकली शिवानी काकडे आणि तिची 51 वर्षीय आजी शारदा कोतवाल या दोघींचा मृत्यू झाला. तर शिवानीची आई हर्षदा काकडे अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत.

पुणे
पुणे
author img

By

Published : Sep 6, 2020, 7:53 PM IST

Updated : Sep 6, 2020, 9:23 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - रोहित्राचा भीषण स्फोट होऊन त्यातील ऑइल अंगावर उडाल्याने चार महिन्यांच्या चिमुकलीसह तिची आई आणि आजी गंभीर जखमी झाल्याची घटना काल (शनिवार) पिंपरी-चिंचवडमध्ये घडली होती. घटनेनंतर सर्व जखमींना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, आज (रविवार) पहाटे उपचारादरम्यान चिमुकली शिवानी काकडे आणि तिची 51 वर्षीय आजी शारदा कोतवाल या दोघांचा मृत्यू झाला तर शिवानीची आई हर्षदा काकडे अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत.

पिंपरी-चिंचवड

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी भोसरी इंद्रायणीनगर येथे रोहित्राचा भीषण स्फोट होऊन भीषण आग लागली. डीपीतील ऑइल शेजारी असलेल्या राजवाडा या इमारतीवर उडाले. त्यावेळी अंगणातील मोकळ्या जागेत हर्षदा या त्यांच्या चार महिन्यांच्या मुलीला अंघोळ घालत होत्या. त्यांच्या आई शारदा या त्यांच्याजवळच होत्या. त्यावेळी हे गरम ऑइल तिघींच्याही अंगावर पडल्याने सर्वजण गंभीररीत्या भाजल्या. चिमुकल्या शिवानीला आंघोळ घातली जात असल्याने तिच्या अंगावर कपडे नव्हते. त्यामुळे उष्ण ऑइल थेट तिच्या शरीरावर पडल्याने ती 60 टक्के टक्के भाजली.

हेही वाचा - चिंताजनक... कोविड रुग्ण संख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर, ब्राझीलपेक्षाही जास्त बाधित

ज्या रोहित्राचा स्फोट झाला त्यातून नेहमी स्पार्किंग व्ह्यायचे आणि दोन दिवसांपूर्वीच रोहित्राला आगही लागली होती. ती आग विझवून महावितरण कर्मचाऱ्यांनी रोहित्राची जुजबी दुरुस्ती केली आणि त्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. तर या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून घटनेसाठी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. तसेच जखमी आणि मृत व्यक्तींना शासनाकडून आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही सांगण्यात आले.

Last Updated : Sep 6, 2020, 9:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.