पुणे - पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. सोमवारी दिवसभरात एकट्या पुणे शहरात कोरोनाचे 399 नवीन रुग्ण सापडले आहेत, तर 10 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडणाऱ्यात एक महिला आणि नऊ पुरुषांचा समावेश आहे.
आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची बाधा झालेले 5,181 रुग्ण सापडले. यातील उपचाराअंती बरे झालेल्या 2,735 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात बरे झालेल्या 175 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 2,182 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आजवर 264 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा चार हजारावर जाऊन पोहोचला आहे. त्यात दररोज नवीन रुग्णाची भर पडत चाललीय. दाट झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडण्याची संख्या मोठी आहे.
पुण्यात आज कोरोनाचे 399 नवे रुग्ण; 10 जणांचा मृत्यू
आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची बाधा झालेले 5,181 रुग्ण सापडले. यातील उपचाराअंती बरे झालेल्या 2,735 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात बरे झालेल्या 175 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.