ETV Bharat / state

Pune District ZP School : पुणे जिल्ह्यातील 'या' गावातील जिल्हा परिषदेची शाळा असते 365 दिवस सुरु - पुणे जिल्ह्यातील कुर्लेडवाडी शाळा कोरोना काळात सुरु

लाखो रुपयांचा खर्च करून जे शिक्षण खासगी शाळेत मिळते, त्यापेक्षाही अत्याधुनिक उत्तम दर्जाचे शिक्षण हे शिरूर तालुक्यातील कर्डेलवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत मिळत आहे. या शाळेला आतापर्यंत जवळपास 350 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहे. शिवाय या शाळेने राज्यात एक वेगळा ठसा उमटवला आहे.

ZP School
ZP School
author img

By

Published : Jan 27, 2022, 9:06 PM IST

Updated : Jan 27, 2022, 9:33 PM IST

पुणे - राज्यात सध्या उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी अनेक पालक खासगी शाळांमध्ये आपल्या पाल्यांना टाकतात. लाखो रुपयांचा खर्च करून जे शिक्षण खासगी शाळेत मिळते, त्यापेक्षाही अत्याधुनिक उत्तम दर्जाचे शिक्षण हे शिरूर तालुक्यातील कर्डेलवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत मिळत आहे. या शाळेला आतापर्यंत जवळपास 350 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहे. शिवाय या शाळेने राज्यात एक वेगळा ठसा उमटवला आहे.

'या' गावातील जिल्हा परिषदेची शाळा असते 365 दिवस सुरु
  • वर्षाचे 365 दिवस चालणारी शाळा

कर्डेलवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्लंड सारख्या पाश्चिमात्य देशांचे आधुनिक दर्जाचे शिक्षण दिले जाते. येथील पहिलीत शिक्षण घेणारा विद्यार्थी हा दुसरी आणि तीसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचाही अभ्यास सहज पुर्ण करू शकतो. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांची प्रगती तुम्हाला पाहिली तर नक्कीच आश्चर्य वाटेल. हे सर्व शक्य झाले आहे येथे शिक्षण देणारे दत्तात्रय सकट आणि बेबीनंदा सकट या शिक्षक दांपत्यामुळे. 2001 साली या शाळेत रुजू झाल्यानंतर सकट दांपत्याने या शाळेचा चेहरा-मोहरा बदलवला. वर्षाचे 365 दिवस चालणारी ही शाळा शिक्षण क्षेत्रात एक नवा पायंडा पाडत असून या शाळेत विद्यार्थी शनिवार रविवार तसेच सण उत्सवाच्या काळातही उपस्थित राहून शाळेत सण-उत्सव साजरे करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणा प्रति एक वेगळी गोडी निर्माण झाली आहे. राज्यातील डिजिटल शिक्षण देणारी ही पहिली शाळा असून याचाच अवलंबनंतर राज्यभरात केला गेला. महत्त्वाचे म्हणजे या शाळेतील शिक्षण घेऊन बाहेर गेलेले विद्यार्थी पुन्हा याच शाळेत येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासारखे ज्ञानदाणाचे पवित्र काम करत असून पहिली ते चौथीपर्यंत चालणारी ही शाळा राज्यात एक वेगळा आदर्श ठरत आहे.

  • कोरोना काळातही सुरू आहे शाळा

जगात 2 वर्षांपासून कोरोनामुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या या काळात राज्यातील शाळा हे ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. पण या काळात काही भागातील शाळा हे दोन वर्षाच्या काळात सुरूच असून त्यातील शिरूर तालुक्यातील कर्डेलवाडी जिल्हा परिषदची शाळा कोरोना काळातही सुरू असून कोरोनाबाबतची सर्व खबरदारी या शाळेत घेतल्या जाते.

  • शालेय अभ्यासक्रमासह परदेशी शिक्षण प्रणालीचा देखील वापर

सकट दाम्पत्य हे सण 2001 साली या शाळेत रुजू झाल्यानंतर या शाळेतील परिस्थिती खूपच नाजूक होती. त्यानंतर हळूहळू सणा सुदीच्या दिवशी तसेच सुट्टीच्या काळातही आम्ही या शाळेत वेळ देत होतो आणि त्यातून विद्यार्थ्यांनाही आवड निर्माण झाली. विद्यार्थीही 365 दिवस शाळेत येऊ लागले. तसेच शिक्षण क्षेत्रात जे तंत्रज्ञान परदेशात वापरले जाते तेच तंत्रज्ञान शाळेत वापरले जाते. शासनाने दिलेल्या अभ्यासक्रमासह याचा परदेशी शिक्षण प्रणालीचा देखील वापर होत असल्याने या मुलांना याचा फायदा होत असतो. तसेच शिक्षणासह इतर विषयांबाबत प्रेरणा दिली जाते. याचा फायदा देखील पुढील काळात या मुलांना होणार, अशी प्रतिक्रिया देखील यावेळी सकट दाम्पत्याने दिली आहे.

  • कर्डेलवाडीचा शिक्षण पॅटर्न राज्यात एक आदर्श ठरणार

'दर्जेदार प्राथमिक शिक्षण हेच खरे विकासाचे लक्षण' हे ब्रीद हाती घेऊन अपार मेहनत करणाऱ्या सकट दाम्पत्याचे शिक्षण क्षेत्रातील काम हे निश्चितच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. त्यामुळे या पुढच्या काळात उच्च दर्जाचे शिक्षण देऊन अधिकारी घडवायचे असतील तर निश्चितच कर्डेलवाडीचा शिक्षण पॅटर्न राज्यात एक आदर्श ठरणार आहे.

हेही वाचा - Solapur Onion Market : सोलापुरात दहा हजार टन कांद्याची आवक.. भाव गडगडले.. शेतकरी हवालदिल

Last Updated : Jan 27, 2022, 9:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.