पुणे - येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 141वा दिक्षांत समारंभ क्षेत्रपाल मैदानावर लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. एनडीएतील तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर एनडीएतील 141वी तुकडी देशसेवेसाठी भारतीय संरक्षण दलात दाखल होणार आहे. एनडीए कमांडंट लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री आणि दक्षिण आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल जेएस नैन यांनी नरवणे यांचे स्वागत केले. कोरोनाच्या सावलीत प्रतिष्ठित पासिंग आऊट परेड आयोजित करण्याचा हा चौथा प्रसंग होता.
राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पोर्टल महिला कॅडेट्ससाठी होणार सुरू -
मेळाव्याला संबोधित करताना लष्करप्रमुख म्हणाले, "आम्ही राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पोर्टल महिला कॅडेट्ससाठी उघडत असताना, मी अपेक्षा करतो की तुम्ही सर्व त्यांचे त्याच भावनेने आणि व्यावसायिकतेने स्वागत कराल, ज्याप्रमाणे भारतीय सशस्त्र दल जगभरात ओळखले जाते. त्याचपद्धतीने राष्ट्रीय संरक्षण अकादमी ओळखले जाईल. नेहमी लक्षात ठेवा की येथून कैडेट्स वेगवेगळ्या अकॅडमीत जातील. वेगवेगळे पोशाख परिधान करतील. मात्र, नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणतीही एक सेवा स्वतःहून आधुनिक युद्धे लढू शकत नाही आणि जिंकूही शकत नाही, असे देखील यावेळी लष्करप्रमुख नरवणे म्हणाले.
यंदा एनडीएच्या 305 कँडिडेट उत्तीर्ण -
एनडीएच्या प्रशिक्षणाच्या दरम्यान विशेष कामगिरी केलेल्या राम क्रीष्णा, एस. लिखित, हर्षवर्धन सिंग या तीन जणांना यावेळी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या हस्ते पदक देऊन गौरव करण्यात आले. यंदा एनडीएमधून 305 कँडिडेट हे उत्तीर्ण झाले आहे. आम्ही एनडीएचा भाग झालो आहेत याचा आनंद आहे. आम्हाला अभिमान आहे की आम्हाला हे पदक मिळाले आहे. अशाच पद्धतीने येणाऱ्या काळात आम्हीदेखील देशाची सेवा करणार आहोत आणि आई वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करणार आहोत, अशी प्रतिक्रिया या तिन्ही कँडिडेट्सनी दिली.
हेही वाचा - Facebook Name Change : 'फेसबुक'ने आपलं नाव बदललं; रिब्रॅंडिंगनंतर आता ‘मेटा’
दीक्षांत समारंभला लष्करीशिस्त,सेवाभाव,आणि राष्ट्रभक्तीच दर्शन
लष्करीशिस्त, सेवाभाव आणि राष्ट्रभक्तीचे दर्शन या सोहळ्यातुन घडले आहे. लष्करी हेलिकॉप्टर, तसेच लढाऊ विमानांची सलामी हे या सोहळ्याचं विशेष आकर्षण होते. त्याच पद्धतीने सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितीत सर्वच आणि मान्यवर यांच्याकडून काटेकोरपणे कोरोना नियमांचे पालन यावेळी करण्यात आले.