पुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशातील व्यवहार ठप्प झाले आहेत. कंपन्या, दुकानं, व्यवसाय बंद असल्यामुळे रोजगार बंद झाले आहेत. लाखो नागरिकांना याचा फटका बसला आहे. संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी अनेक संस्था, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, दानशूर नागरिक पुढे येत आहेत. जमेल तशी मदत या गरजू लोकांना करत आहेत. पुण्यातील शीख बांधवानी कोरोनाशी लढा देण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या 300हून अधिक पीपीई किट्स डॉक्टरांकडे सुपूर्द केल्या आहेत.
कोरोनाबाधित मुस्लीम मृतदेहांचे दफन करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेला जवळपास १०० किट, आर्मी हॉस्पिटलला १०० आणि एड्सबाधित रुग्णांसाठी काम करणाऱ्या संघटनेला ५० हून अधिक पीपीई किट देण्यात आल्या आहेत,अशा एकूण ३०० किट देण्यात आल्या आहेत.