ETV Bharat / state

बारामतीतील विविध योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तीन कोटी प्राप्त - बारामती तालुक्यातील 11 हजार 342 लाभार्थ्यांसाठी 3 कोटी 88 लाख 4 हजार रुपये 1 मे रोजी देण्यात येणार आहे

केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून विविध योजनेद्वारे देण्यात येणाऱ्या लाभाची रक्कम एप्रिल ते जून महिन्यांच्या कालावधीचे एकत्रितपणे देण्यासाठी बारामती तालुक्यातील 11 हजार 342 लाभार्थ्यांसाठी 3 कोटी 88 लाख 4 हजार रुपये 1 मे रोजी देण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय. पुणे
जिल्हाधिकारी कार्यालय. पुणे
author img

By

Published : Apr 29, 2020, 3:59 PM IST

बारामती/पुणे - कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती विचारात घेऊन केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या विविध योजनेचा लाभ लाभार्थ्यांना एप्रिल ते जून या ३ महिन्यांच्या कालावधीचे अर्थसहाय्य एकत्रितपणे एप्रिल महिन्यात लाभार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्याचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार बारामती तालुक्यातील 11 हजार 342 लाभार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यावर 1 मे रोजी अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून 3 कोटी 88 लाख 4 हजार रुपये देण्यात आले आहेत.

समाजातील गरजू विधवा, परितक्त्या, अपंग, वयोवृद्ध, निराधारांना केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अर्थसाहाय्य केले जाते. त्यानुसार शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी अपंग निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित अनुदानाशिवाय एप्रिल व मे महिन्यात प्रत्येकी ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

बारामती तालुक्यातील लाभार्थी व अनुदानाची रक्कम
योजनेचे नावलाभार्थी संख्याअनुदान वाटप सानुग्रह अनुदान वाटपएकूण वाटप
वृध्दकाळ निवृत्ती योजना1 हजार 80110 लाख 80 हजार 60018 लाख 1 हजार28 लाख 81हजार 600
विधवा निवृत्ती योजना4136 हजार 90041 हजार77 हजार 900
दिव्यांग निवृत्ती योजना54 हजार 5005 हजार9 हजार 500
संजय गांधी योजना4 हजार 1461 कोटी 16 लाख 99 हजार 100-11 कोटी 69 हजार 9 हजार 100 (सर्व साधारण)
संजय गांधी योजना83623 लाख 68 हजार 200-23 लाख 68 हजार 200 (अ.जाती)
श्रावणबाळ योजना 3 हजार 735 1 कोटी 36 लाख 83 हजार 200-1 कोटी 36 लाख 83 हजार 200 (सर्व साधारण)
श्रावण योजना 77821 लाख 64 हजार 500-21 लाख 64 हजार 500 (अ.जाती)
एकूण11 हजार 3423 कोटी 10 लाख 37 हजार18 लाख 47 हजार 3 कोटी 28 लाख 84 हजार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.