पुणे - शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. आज दिवसभरात २७५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली तर २५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दिवसभरात सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.
सध्या पुण्यात २ हजार ४१३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील १९५ रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पुण्यात कोरोनाचे एकूण ७ हजार ७२२ आढळले आहेत. यातील ३७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर एकूण ४ हजार ९३४ रुग्णांनी कोरोवर मात केली आहे.