पुणे - नवरदेवासह लग्नसोहळ्याला उपस्थित असलेल्या 23 पेक्षा अधिक नातेवाईकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना जुन्नर तालुक्यातील निमदरी येथील धोंडकर वाडीमध्ये घडली आहे. याच कुटुंबातील एका वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.
23 पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात लॉकडाऊन आहे, त्यामुळे केवळ 25 लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्नाला मुभा देण्यात आली आहे, यानुसार धोंडकरवाडीमध्ये ऋषिकेश धोंडकर व आरती फोडसे यांचा विवाह सोहळा 4 मेला पार पडला, लग्नानंतर 5 मेला सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. या पुजेला नातेवाईकांनी गर्दी केली. दरम्यान लग्नानंतर दोन दिवसांनी नवरदेव मुंबईला जाऊन आला, मुंबईला जाऊन आल्यानंतर त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने लग्नाला उपस्थित इतर नातेवाईकांची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली, यातील तब्बल 23 पेक्षा अधिक जणांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - 'मराठा समाजाने संयम बाळगावा, ही वेळ मोर्चे काढायची नाही'