ETV Bharat / state

राज्यात 208 पोलिसांचा कोरोनाशी लढताना मृत्यू - गृहमंत्री अनिल देशमुख - महाराष्ट्र पोलीस

कोरोना काळात कर्तव्य निभावताना 208 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या पोलिसांच्या कुटुंबाला एकूण 65 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अनिल देशमुख
अनिल देशमुख
author img

By

Published : Sep 20, 2020, 2:31 PM IST

Updated : Sep 20, 2020, 3:59 PM IST

पुणे - कोरोनाच्या काळात मागील सात महिन्यांत पोलिसांनी खूप काम केले आहे. आमचे पोलीस जरूर थकले आहेत. पण हिम्मत हरलेले नाहीत. या काळात कर्तव्य निभावताना 208 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या पोलिसांच्या कुटुंबाला 65 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी वार्तालाभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

पोलीस भरती प्रकिया ही मोठी आहे. साडेबारा हजार जागांसाठी जवळपास पाच ते सहा लाख अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रक्रियेला 4 ते 5 महिने लागतील. साडेबारा हजार पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मराठा समाजासाठी 13 टक्के जागा राखीव ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी कायदेशीर सल्ला घेणार आहे. मराठा समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गृहमंत्री अनिल देशमुख

कोरोनाच्या काळात गेली साडेचार महिने पोलिसांनी उत्कृष्ट काम केले आहे. ते थकलेत पण त्यांनी हिंमत हरली नाही, असेही यावेळी अनिल देशमुख म्हणाले. पुणे पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. कोरोनाच्या काळात त्यांचे बावधन प्रकरण खूप गाजले होते. कोरोनाच्या काळात अमिताभ गुप्ता यांच्याकडून खूप मोठी चूक झाली होती, त्यांना त्याची शिक्षाही झाली आहे. अमिताभ गुप्ता हे एक चांगले अधिकारी आहेत. त्यांचे काम खूप चांगले आहे, असेही गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

Last Updated : Sep 20, 2020, 3:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.