ETV Bharat / state

पुण्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर; दाखल केले उमेदवारी अर्ज - खडकवासला मतदारसंघ

कसब्यात शिवसेनेकडून बंडखोरी करत कसबा मतदारसंघातून शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे तर खडकवासला मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

पुण्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर
author img

By

Published : Oct 3, 2019, 9:31 PM IST

पुणे- येथे आज गुरुवारी सर्वपक्षीय उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पुण्यात भाजपने आठही मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. तर पुण्यात शिवसेनेला एकही जागा न दिल्याने शहरातील नगरसेवक विशाल धनवडे आणि सेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनी बंडखोरी करत कसबा आणि खडकवासला मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यास याठिकाणी निवडणूक रंगतदार होऊ शकते.

पुण्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर

हेही वाचा- पुण्यात चंद्रकांत पाटीलांनी शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज

पुण्यात शक्ती प्रदर्शन करत भाजपच्या उमेदवारांनी आठही मतदारसंघात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल केला. पुण्याच्या कॅन्टोमेन्ट मतदारसंघातून राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे भाऊ सुनील कांबळे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. वडगावशेरी मतदारसंघातून जगदीश मुळीक, भाजप पुणे शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी पर्वती मतदारसंघातून, शिवाजीनगर मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे, हडपसर मतदारसंघातून भाजपच्या योगेश टिळेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. तर कसब्यात शिवसेनेकडून बंडखोरी करत कसबा मतदारसंघातून शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांनी अर्ज भरल्याने रंगत वाढली. खडकवासला मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेला जागा न मिळाल्याने उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे उमेदवारांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसकडून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी कॅन्टोमेन्ट मतदारसंघातून, तर शिवाजीनगर मधून दत्ता बहिरट यांनी अर्ज दाखल केला आहे.

Intro:पुण्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर दाखल केले उमेदवारी अर्जBody:mh_pun_02_nomination_situation_pune_pkg_7201348

anchor
पुण्यात गुरुवारी सर्वपक्षीय उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पुण्यात भाजपने आठही मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत.तर पुण्यात शिवसेनेला एकही जागा न दिल्याने शहरातील नगरसेवक विशाल धनवडे आणि सेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनी बंडखोरी करत कसबा आणि खडकवासला मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे
त्यामुळे या उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यास याठिकाणी निवडणुक रंगतदार होऊ शकते. पुण्यात शक्ती प्रदर्शन करत भाजपच्या उमेदवारांनी आठही मतदारसंघात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.कसबा मतदारसंघातुन मुक्ता टिळक यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल केला. पुण्याच्या कॅन्टोमेन्ट मतदारसंघातून राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे भाऊ सुनील कांबळे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. वडगावशेरी मतदारसंघातून जगदीश मुळीक भाजप पुणे शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी पर्वती मतदारसंघातून शिवाजीनगर मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे हडपसर मतदारसंघातुन भाजपच्या योगेश टिळेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला.तर कसब्यात शिवसेनेकडून बंडखोरी करत कसबा मतदारसंघातून शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांनी भरल्याने रंगत वाढली.खडकवासला मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला.शिवसेनेला जागा न मिळाल्याने उमेदवारी अर्ज दाखल केल्याच उमेदवारानी सांगितले.
काँग्रेसकडून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी कॅन्टोमेन्ट मतदारसंघातून शिवाजीनगर मधून दत्ता बहिरट यांनी अर्ज केला दाखल..

Byte - रमेश कोंडे,शिवसेना बंडखोरConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.