जुन्नर (पुणे) - अष्टविनायकांपैकी एक ओझर येथील विघ्नहर मंदिरातून श्रींच्या सुवर्णलेपीत छत्री चोरून नेणारे दोन आरोपी आळेफाटा पोलिसांनी बेल्हे गावाजवळ दरोडा टाकताना रंगेहाथ पकडले. आहेत याप्रकरणी आणखी तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. आळेफाटा पोलिसांनी रात्र गस्तीच्या वेळी ही कारवाई केली.
विठ्ठल पतवे (वय 47 वर्षे) व सोन्या पतवे (वय 27 वर्षे, दोघेही रा. अकोले) या आरोपींना अटक करण्यात आले असून, अन्य तिघांचा शोध सुरू आहे.
ओझरच्या विघ्नहर मंदिरातून 27 जुलैला दोन किलो वजनाची चांदीची सुवर्णलेपीत छत्री चोरट्यांनी चोरून नेली होती. तर गाभाऱ्यात असलेल्या दोन दानपेट्यांपैकी, एक दानपेटी फोडून रक्कम लांबवली होती. आरोपींकडून दुचाकीसह चॅापर, कोयता, कटावणी असे दरोडा घालण्यासाठी आणलेले साहित्य जप्त केल्याची माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी दिली.
विघ्नहर गणपती मंदिरातील चोरीचा छडा आळेफाटा पोलिसांच्या कामगीरीमुळे लागणार असल्याने गणेशभक्तांमध्ये आनंदाची भावना व्यक्त होत आहे.
हेही वाचा - सांगा गणपती विसर्जन करायचे कुठे? शिवसेनेचे पालिकेमध्ये आंदोलन