पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवडमधून एका अल्पवयीन निर्भयाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून तिचा शोध घेतला जात आहे. एकीकडे तिला फुस लावून अज्ञाताने घेऊन गेल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी 26 फेब्रुवारी 2022 रोजी चिखली पोलिसांत कलम 363 (अपहरण) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात 26 तारखेला सायंकाळी आठ वाजता 17 वर्षीय अल्पवयीन निर्भयाचे अपहरण करण्यात आले. चिखली मोई फाटा येथून तिला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. अनेकदा असे प्रकार प्रेम प्रकरणातून घडतात, मुली परत ही येतात. मात्र अल्पवयीन मुलगी न आल्याने चिंता वाढली आहे. 25 ते 30 दिवस उलटून ही अल्पवयीन मुलगी न आल्याने तिचा शोध चिखली पोलीस घेत आहेत.
अपहरण झालेल्या निर्भयाचे वर्णन खालीलप्रमाणे
उंची पाच फूट, रंगाने गोरी, अंगाने सडपातळ, चेहरा गोल, नाक बसक, केस लांब, अंगात काळ्या रंगाचा टॉप आणि कुर्ती, पायात पिवळसर रंगाची चप्पल, तिला मराठी आणि हिंदी भाषा येते, अशी माहिती तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक डी. यस. मुंडकर यांनी दिली आहे. संबंधित मुलगी कुठे दिसल्यास किंवा आढळल्यास चिखली पोलीस ठाणे टेलिफोन क्रमांक 020-27492525 यावर कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने तरुणाचे अपहरण; जालना येथून दोघांना अटक