ETV Bharat / state

पूर परिस्थितीत अडकलेल्या 17 पर्यटकांना शिवदुर्ग टीमच्या मदतीने पोलिसांनी काढले बाहेर - पोलीस

इंद्रायणी नदीचे रुप पाहून पर्यटक त्यांच्या सोबत येण्यास तयार नव्हते. तेव्हा शिवदुर्गच्या पथकातील काही व्यक्तींनी पर्यटकांची समजूत काढत लाईफ जॅकेट, बोट सोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर पर्यटकांना दोरीच्या साह्याने, साडेचार तासाच्या अथक प्रयत्नानंतर अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले. पर्यटकांमध्ये काही लहान मुले व वयोवृद्धांचा देखिल समावेश होता. दरम्यान, इंद्रायणी नदी तुडुंब भरल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पूर परिस्थितीत अडकलेल्या १७ पर्यटकांना शिवदुर्ग टीमच्या मदतीने पोलिसांनी काढले बाहेर
author img

By

Published : Jul 28, 2019, 5:51 AM IST

Updated : Jul 28, 2019, 6:12 AM IST

पुणे - मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. अशामध्ये लोणावळा परिसरात फिरण्यासाठी आलेले 17 पर्यटक ओशो आश्रमात अडकले होते. शिवदुर्गचे पथक आणि पोलिसांनी या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले. हे सर्व पर्यटक गुजरातच्या अहमदाबाद येथील असून ते लोणावळा पर्यटनस्थळे फिरण्यासाठी आले होते.

पूर परिस्थितीत अडकलेल्या 17 पर्यटकांना शिवदुर्ग टीमच्या मदतीने पोलिसांनी काढले बाहेर

लोणावळा परिसरातील मळवली जवळच्या देवले भाजे गावच्या हद्दीमध्ये अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. अशामध्ये लोणावळा फिरण्यासाठी आलेल्या पर्यटक ओशो आश्रमात अडकले असल्याची माहिती, शिवदुर्गच्या टीमला शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मिळाली. तेव्हा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शिवदुर्गचे १५ जणांचे पथक कामशेत, लोणावळा ग्रामीण पोलिसांसह तिथे पोहोचले.

इंद्रायणी नदीचे रुप पाहून पर्यटक त्यांच्या सोबत येण्यास तयार नव्हते. तेव्हा शिवदुर्गच्या पथकातील काही व्यक्तींनी पर्यटकांची समजूत काढत लाईफ जॅकेट, बोट सोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर पर्यटकांना दोरीच्या साह्याने, साडेचार तासाच्या अथक प्रयत्नानंतर अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले. पर्यटकांमध्ये काही लहान मुले व वयोवृद्धांचा देखिल समावेश होता. दरम्यान, इंद्रायणी नदी तुडुंब भरल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शिवदुर्गच्या या टीमने पर्यटकांना काढले बाहेर -
सुनिल गायकवाड, राजेंद्र कडु, विकास मावकर, अनिल आंद्रे, शुभम आंद्रे, प्रणय अंभोरे, राहुल देशमुख, सागर कुंभार, दुर्वेश साठे, केदार देवाळे, चंद्रकांत बोंबले, ब्रिजेश ठाकुर, सनी कडु, अभिजीत बोरकर आणि ओंकार पडवळ

Intro:mh_pun_07_lonavla_tourist_av_10002Body:mh_pun_07_lonavla_tourist_av_10002

Anchor:- लोणावळा परिसरात पूर परिस्थितीत अडकलेल्या १७ पर्यटकांना वाचवण्यात शिवदुर्ग आणि पोलिसांना यश आले आहे. हे सर्व पर्यटक गुजरात आणि अहमदाबाद येथून लोणावळा पर्यटन स्थळे फिरण्यासाठी आले होते. मात्र, दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस लोणावळा परिसरात कोसळत असल्याने हे पर्यटक ओशो या आश्रमात अडकले होते. पुरातून बाहेर काढण्यासाठी शिवदुर्ग चे १५ जणांचे पथक आणि कामशेत, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली होती. साडेचार तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आहे. मळवली नजिकच्या देवले भाजे गावच्या हद्दीमध्ये पावसाच्या अतिवृष्टी मुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने ओशो या आश्रमात गुजरात आणि अहमदाबाद येथील १७ पर्यटक अडकले होते. त्यामध्ये काही लहान मुले व वयोवृद्धांचा देखिल समावेश होता. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास शिवदुर्ग टीम ला फोनद्वारे ओशो आश्रमात पर्यटक अडकल्याची माहिती मिळाली होती. ते दुपारी एक च्या सुमारास संबंधित ठिकाणी पोहचले. पर्यटक हे पूर परिस्थिती पाहून त्यांच्या सोबत येण्यास तयार नव्हते. तसेच वेळ होईल तसे इंद्रायणी नदीचे पाणी वाढत होते. अखेर शिवदुर्ग च्या पथकातील काही व्यक्तींनी समजावून सांगत लाईफ जॅकेट, बोट असल्याचे सांगून पर्यटकांना पाण्यातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तर काही पर्यटक हे दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश आले. इंद्रायणी नदी तुडुंब भरल्याने नदी काठ च्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुनिल गायकवाड,राजेंद्र कडु,विकास मावकर, अनिल आंद्रे,शुभम आंद्रे,प्रणय अंभोरे,राहुल देशमुख, सागर कुंभार,दुर्वेश साठे,केदार देवाळे,चंद्रकांत बोंबले, ब्रिजेश ठाकुर,सनी कडु,अभिजीत बोरकर,ओंकार पडवळ, या शिवदुर्ग च्या टीम ने पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यश मिळवले.

Conclusion:
Last Updated : Jul 28, 2019, 6:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.