ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये 4 पिस्तूलांसह 15 काडतुसे जप्त; आरोपी जेरबंद - Pimpri-Chinchwad Crime news

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला गुन्हे शाखा युनिट-3 जेरबंद केले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये 4 पिस्तूलसह 15 काडतूसे जप्त
author img

By

Published : Sep 4, 2019, 5:20 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला गुन्हे शाखा युनिट-3 जेरबंद केले आहे. या व्यक्तीकडून 4 पिस्तुले आणि 15 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सिध्दार्थ ऊर्फ रौनक रिपुमन शर्मा (वय-22, रा. दिघी, मूळगाव बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये 4 पिस्तूलसह 15 काडतूसे जप्त

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी संबंधित पिस्तुल आणि काडतुसे बाबा पांडे आणि सँडी गुप्ता यांच्या टोळीला देणार होता. मात्र, त्याअगोदरच पिस्तुल पुरवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सिद्धार्थ शर्मा हा दिघी मॅगझीन चौक येथे बाबा पांडे आणि सँडी गुप्ताच्या सांगण्यावरून 4 पिस्तुल आणि 15 काडतुसे घेऊन आला होता. याची माहिती गुन्हे शाखा युनिट- 3 चे कर्मचारी त्रिनयन बाळसराफ यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले.

त्यानुसार या पथकाने सापळा रचून आरोपी शर्माला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने सराईत गुन्हेगार बाबा पांडे आणि सँडी गुप्ता यांच्या सांगण्यावरून बिहार येथून पिस्तुल आणि काडतुसे आणल्याची कबुली दिली. दरम्यान, पांडे आणि गुप्ता यांच्या टोळीवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाययक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस कर्मचारी जमीर तांबोळी, राहुल खारगे, सागर जैनक, सचिन मोरे, गंगाधर चव्हाण, योगेश आढारी, अरुण नरळे यांनी केली.

Intro:mh_pun_01_ pistol_avb_mhc10002Body:mh_pun_01_ pistol_avb_mhc10002

Anchor:- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या इसमाला गुन्हे शाखा युनिट तीन ने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ४ पिस्तुल आणि १५ काडतुसे हस्तगत केली आहे. संबंधित पिस्तुल आणि काडतुसे हे बाबा पांडे आणि सँडी गुप्ता यांच्या टोळीला देणार होता, मात्र त्या अगोदरच पिस्तुल पुरवणाऱ्या इसमाला अटक केली आहे. सिध्दार्थ ऊर्फ रौनक रिपुमन शर्मा वय-२२ , रा. दिघी. मूळगाव बिहार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुप्ता आणि पांडे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी सिद्धार्थ शर्मा हा दिघी मॅगझीन चौक येथे बाबा पांडे आणि सँडी गुप्ता च्या सांगण्यावरून ४ पिस्तुल आणि १५ काडतुसे घेऊन आला होता. याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीन चे कर्मचारी त्रिनयन बाळसराफ यांना गुप्त माहिती मिळाली संबंधित आरोपी शर्मा हा येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. त्यानुसार सापळा रचून आरोपी शर्मा ला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सराईत गुन्हेगार बाबा पांडे आणि सँडी गुप्ता यांच्या सांगण्यावरून बिहार येथून पिस्तुल आणि काडतुसे आणल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, त्यांच्या टोळीवर गंभीर गुन्हे दाखल असून एक खुनाचा गुन्हा दाखल आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाययक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस कर्मचारी जमीर तांबोळी, राहुल खारगे, सागर जैनक, सचिन मोरे, गंगाधर चव्हाण, योगेश आढारी, अरुण नरळे यांनी केली आहे.

बाईट:- भानुदास जाधव: वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.